कोरोनाशी लढण्यासाठी मदतीचा धनादेश प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्याकडे देताना नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, शेजारी नायब तहसिलदार डी. एम. नांगरे, प्रथमेश काणेकर. |
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेनदिवस वाढत आहे. चंदगड तालुक्यातही त्याचा फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरातून कोविड १९ शी लढण्यासाठी प्रशासनाला पाठबळ दिले जात आहे. या जाणिवेतून कोरोनाशी लढण्यासाठी चंदगड शहराच्या प्रथम नागरीक नगराध्यक्षा सौ. प्राची दयानंद काणेकर यांनी दहा हजार रुपयांचा धनादेश प्रांताधिकारी विजया पांगारकर, नायब तहसीलदार डी .एम. नागरे यांच्याकडे सोपविण्यात आले.
कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वच स्तरावर मदतीचे हात पुढे येत आहेत. चंदगड तालुक्यात कोविड 19 सेंटर उभे राहणार असून यासाठी सरपंच संघटना व अन्य नागरिकांनी पीपीई किट सारखी मदत होत आहे. समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो या जाणिवेतून नगराध्यक्षा सौ. काणेकर यांच्या वैयक्तिकरित्या दहा हजार रुपयांचा धनादेश प्रशासनाकडे दिला आहे. यावेळी प्रथमेश दयानंद काणेकर उपस्थित होते. यापूर्वी यांचे पती उद्योजक, चंदगड अर्बन बँकेचे चेअरमन व पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर यांनीही मदत केली आहे. त्याचबरोबर दयानंद काणेकर यांनी पुरकाळातही सढळ हाताने मदत कली होती.
No comments:
Post a Comment