कोल्हापूर जिल्हा काँग्रेसकडून सार्वजनिक ठिकाणी ५०० हँड सॅनिटायझर मशीन बसविण्याचा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2020

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसकडून सार्वजनिक ठिकाणी ५०० हँड सॅनिटायझर मशीन बसविण्याचा उपक्रम

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसकडून सार्वजनिक ठिकाणी ५०० हँड सॅनिटायझर मशीन बसविण्याचा उपक्रमावेळी उपस्थित मान्यवर. 
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
      कोरोनाच्या या संकटामध्ये गेली तीन महिने जिल्हा कॉंग्रेसचे सर्व आमदार, सर्वच सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय मदत कार्य करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण स्वतःहून काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. घराबाहेर पडताना मास्क वापराने, हात वारंवार स्वच्छ ठेवणे आदी खबरदारी आपण सर्वांनीच घ्यायला हवी. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणीसुद्धा योग्य सॅनिटायझर व्यवस्था असणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी ५०० हँड सॅनिटायझर मशीन बसविण्याचा उपक्रम जिल्हा काँग्रेस कमिटीकडून आज सुरु करण्यात आला आहे. ह्या मशीन्स पहिल्या टप्यात प्रामुख्याने सर्व सरकारी कार्यालये, एस टी स्टँड, बाजार पेठेमधील मुख्य ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.
      यावेळी, महापौर निलोफर आजरेकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद  चव्हाण, उपमहापौर संजय मोहिते, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक,  नगरसेवक तौफीक मुल्लाणी, कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, महिला शहराध्यक्षा संध्या घोटणे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक शशांक बावचकर, किसन कुऱ्हाडे, अनुप पाटील, युवक काँग्रेस शहरध्यक्ष दीपक थोरात, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे, त्याचबरोबर कॉंग्रेसचे सर्व तालूकाध्यक्ष विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment