किटवाड येथील रक्तदान शिबिरास रक्तदात्याचा प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2020

किटवाड येथील रक्तदान शिबिरास रक्तदात्याचा प्रतिसाद

किटवाड येथे आयोजित रक्तदान शिबीर प्रसंगी शिवप्रतिमेचे पूजन करताना मान्यवर.. 
तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा
     सध्या काही दिवसापासून कोरोनासारख्या महाभयंकर महामारीचे सावट जगात ठाण मांडून बसले असताना लोकांच्या आरोग्याचा प्रश्न हा आपल्या सर्वांसमोर उभा आहे. चला रक्तदान  मोहीम  राबवुया, 
रक्तदान करुन जीव  वाचवूया. देशाच्या  आरोग्याला  मुंगी होऊनी  हातभार  देऊया. याच मानवतावादी दृष्टीकोण समोर ठेवत ज्ञान सेवा त्याग मंडळ किटवाड (ता. चंदगड) यांच्या वतीने आयोजित केलेल्या  रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला.
          यामधे एकूण 75 रक्तदाते शिबिराला आले. त्यामधे एकूण 64 जणांनी रक्तदान केले. तरुण मुले व काही महिला तसेच कूद्नूर आणि कालकुंद्री गावातून काही रक्तदात्यांनी सहभाग दाखवला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमीचे पूजन करून रक्तदान शिबिराची सुरवात झाली. रक्तदात्यांची पूर्व नोंदणी, सोशल डिस्टंसिन्ग, रक्तदान शिबीराच्या खोल्या निर्जंतुकीकरण अशा विविध गोष्टींची खबरदारी लक्षात घेऊन रक्तदान शिबीर पार पाडले. यामध्ये मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा समावेश होता. सर्व रक्तदाते, कार्यक्रमासाठी विशेष  सहकार्य केलेल्या गडहिंग्लज लायन्स ब्लड बँक, मंडळ चे सर्व आयोजक,  तसेंच ग्रामस्थ यांचे आभार  मंडळाकडून मानण्यात आले.

No comments:

Post a Comment