चंदगड शहरातील सलून व्यावसायिकांच्या वतीने दुकाने चालू करण्यासाठी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. |
कोरोना काळात सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात काही उद्योग व दुकानांना सुरु करण्याला काही अटीवर मुभा देण्यात आली. मात्र सलून व्यवसाय अजूनही बंद आहे. गेल्या अडीच तीन महिन्यापासून सलून व्यवसाय बंद आहे. त्यामुळे व्यावसायिकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत शासनाकडे मागणी करुनही अजूनही सलून व्यावसायिकांना परवानगी दिली नाही. त्यामुळे आज चंदगड तालुका नाभिक समाजाच्या वतीने चंदगड शहरामध्ये महाराष्ट्र राज्य नाभिक समाज महामंडळ यांच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. पाठीवर मारा, पण पोटावर मारु नका असे भावनिक आवाहनही सलून व्यावसायिकांनी निषेध फलकातून केले.
यावेळी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख प्रसाद वाडकर, दुकान मालक संघटनेचे अध्यक्ष अशोक शिवनगेकर, शहर अध्यक्ष सुनिल वाडकर, शहर उपाध्यक्ष विशाल संकपाळ, सेक्रेटरी संदिप वाडकर, विजय नावलगी, संतोष वाडकर, दिपक सुर्यवंशी, ओमकार माने, मंगेश लाटगांवकर, सतीश जगताप, राजू शिवनगेकर, चंद्रकांत शिवनगेकर, अनिकेत वाडकर, अमित बोवाळकर, तातोबा लाटगांवकर, अमर यादव, एकनाथ गवसेकर, रवि संकपाळ, नारायण यादव, विनायक शिवनगेकर, अनंत वाडकर, कृष्णा वाडकर, बाळासाहेब वाडकर, राजु कोरी, ज्ञानेश्वर चंदगडकर, मनोहर शिवनगेकर, वैभव शिवनगेकर हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment