चंदगड तालुक्याची उज्वल निकालाची परंपरा कायम, 51 विद्यालयाचा निकाल 100 टक्के - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2020

चंदगड तालुक्याची उज्वल निकालाची परंपरा कायम, 51 विद्यालयाचा निकाल 100 टक्के

निकाल पाहतानाचे संग्रहित छायाचित्र
सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
          मार्च 2020 मध्ये झालेल्या एस. एस. सी. परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. दहावी परीक्षेचा चंदगड तालुक्याचा निकाल 98.75 टक्के लागला. तालुक्याच्या एकूण माध्यमिक विद्द्यालयामधून 2578 विद्यार्थ्यी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 2546 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 51 विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. तालुक्यामध्ये 1449 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, पहिल्या ग्रेडने 787, दुसऱ्या ग्रेडने 270 तर पास ग्रेडने 40 विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत.
          परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता ऑनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेट कॅफे, संगणक प्रशिक्षण केंद्रे याचा आधार घेतला. सध्या स्मार्टफोनचे युग असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरच निकाल पाहणे पसंद केले. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही निकालाची उज्वल परंपरा राखण्यास तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांना यश आले. 
           100 टक्के निकाल लागलेली माध्यमिक 51 विद्यालये - 
श्री सरस्वती विद्यालय, कालकुंद्री (100), श्रीराम विद्यालय, कोवाड (100), जनता विद्यालय, तुर्केवाडी (100), श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल, माणगाव (100), ताम्रपर्णी विद्यालय, शिवनगे (100), श्री. छत्रपती शिवाजी हायस्कुल, पाटणे (100), मामासाहेब लाड विद्यालय, ढोलगरवाडी (100), श्री सिध्देश्वर हायस्कुल, कुदनूर (100), श्री शिवशक्ती हायस्कुल, अडकूर (100), श्री नरसिंग हायस्कुल, निट्टूर (100), सह्याद्री विद्यालय, हेरे (100), जयप्रकाश विद्यालय, किणी (100), संजय गांधी विद्यालय, नागनवाडी (100), धनंजय विद्यालय, नागनवाडी (100), राजगोळी खुर्द हायस्कुल, राजगोळी (100), वसंत विद्यालय, शिनोळी खुर्द (100), श्री मल्लनाथ हायस्कुल, कानुर खुर्द (100), श्री माऊली विद्यालय, तिलारीनगर (100), श्री वैजनाथ विद्यालय, देवरवाडी (100), यशवंतराव चव्हाण हायस्कुल, सुरुते (100), श्री नागनाथ हायस्कुल, नागरदळे (100), नामदेवराव दुंडगेकर हायस्कुल, मलतवाडी (100), श्री. व्ही. के. चव्हाण-पाटील विद्यालय, कागणी (100), संत तुकाराम हायस्कुल, सुंडी (100), श्री भावेश्वरी विद्यालय, नांदवडे (100), श्री हनुमान विद्यालय, मांडेदुर्ग (100), चंदगड उर्दु हायस्कुल, चंदगड (100), सौ. चव्हाण-पाटील गर्ल्स हायस्कुल, निट्टूर (100), जी. जी. व्ही. पाटील माध्यमिक विद्यालय, म्हाळेवाडी (100), दुंडगे विद्यालय, दुंडगे (100), न्यु हायस्कुल, अलबादेवी (100), आदर्श हायस्कुल कामेवाडी (100), भरमू सुबराव पाटील हायस्कुल, होसुर (100), तेऊरवाडी माध्यमिक विद्यालय, तेऊरवाडी (100), एन. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, होसुर (100), छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय, ढेकोळी (100), श्री दत्त हायस्कुल, राजगोळी (100), भाजी दाजिबा देसाई विद्यालय पार्ले (100), स्वामी विवेकानंद विद्यालय, गुडेवाडी (100), भावेश्वरी संदेश विद्यालय, कानुर बुद्रुक (100), स्वामी विवेकानंद विद्यालय, दाटे (100), सातेरी विद्यालय, कोलिक (100), आसगाव माध्यमिक विद्यालय, आसगाव (100), श्री रवळनाथ माध्यमिक विद्यालय, चंदगड (100), श्री सोमनाथ विद्यालय, हिंडगाव (100), आदर्श विद्यालय, इसापूर (100), सौ. मीनाताई ठाकरे हायस्कुल, कालकुंद्री (100), श्री हनुमान विद्यालय, करंजगाव (100), विवेक इंग्लिश मेडियम स्कुल, हलकर्णी (100), सेंट स्टिफन इंग्लिश मेडियम स्कुल, चंदगड (100), कारमेल आशिष कॉनव्हेंट स्कुल, अडकूर (100).

                          अन्य माध्यमिक विद्यालये - 
दि न्यु इंग्लिश स्कुल, चंदगड (97.77), महात्मा फुले विद्यालय कार्वे (98.83), श्री रामलिंग हायस्कुल, तुडये (98.46), हलकर्णी हायस्कुल, हलकर्णी (98.46), डुक्करवाडी विद्यालय, बागिलगे (98.57), साई विद्यालय, इब्राहिमपूर (97.14), ब्रम्हलिंग विद्यालय, हजगोळी (94.44), भावेश्वरी विद्यालय, आमरोळी (97.50), पद्मश्री वसंतदादा विदयालय, जंगमहट्टी (96.29), श्री शरदचंद्र विद्यालय, कुरणी (97.22), श्री स्वयंभु माध्यमिक विद्यालय, उमगाव (81.25), भावेश्वरी विद्यालय, बसर्गे (90.90), शिवराज विद्यालय महिपाळगड (94.73), श्री चाळोबा माध्यमिक विद्यालय, सातवणे (96.42), राजश्री शाहु माध्यमिक विद्यालय, शिनोळी बुद्रुक (100), कालानंदीगड विद्यालय, कलिवडे-आंबेवाडी (54.54).


No comments:

Post a Comment