चंदगड शहरात पहिला पॉझिटिव्ह, यशवंतनगर येथेही आणखी एकजण बाधीत - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2020

चंदगड शहरात पहिला पॉझिटिव्ह, यशवंतनगर येथेही आणखी एकजण बाधीत

सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
        चंदगड शहरात आज मंगळवारी कोरोनाचा पहिला रूग्ण सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तसेच आज दिवसभरात यशवंतनगर येथील एक असे आज दिवसभरात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने धोका वाढला आहे. 
       चंदगड शहराच्या रामदेव गल्लीत राहणारा एक व्यक्ती पॉझिटिव्ह निघाला आहे. नगरपंचायत व आरोग्य विभाग तसेच संपूर्ण प्रशासनाने शहरात हा संसर्ग येवू नये यासाठी अत्यंत काटेकोर अंमलबजावणी करत दक्षता घेतली होती. जानेवारी पासून संपूर्ण देश याबाबत दक्षता घेत आहे. आता पर्यंत चंदगड तालुक्यातील ठिक ठिकाणी कोरोना संसर्ग चे पॉझिटिव्ह सापडले आहेत. तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चारशेच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र आता पर्यंत चंदगड शहरात एकही रुग्ण नव्हता. आज मात्र चंदगड शहरातील रामदेव गल्लीत एक पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने आज मंगळवारी दुपार नंतर शहरात या घटनेची एकच चर्चा होती. 
     शहरातील रामदेव गल्ली, गुरूवार पेठ व शिवाजी गल्ली हा भाग यापूर्वी पासून दक्षतेखाली आहे. पण शहरात आजवर एकही पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. काही दिवसापूर्वी गडहिंग्लज विभागात गडहिंग्लज व आजरा ही दोन शहरे तसेच चंदगड या ठिकाणी कोणी पॉझिटिव्ह नव्हते. गडहिंग्लज व आजरा शहरा नंतर चंदगड शहरातही पॉझिटिव्ह सापडल्याने गडहिंग्लज विभागातील तीन्हीही तालुक्याची ठिकाणे आता पॉझिटिव्हमध्ये आली आहेत. दाटीवटीत असलेल्या ठिकाणी पॉझिटिव्ह सापडल्याने तीन्हीही छोट्या शहरांतील लोकांना दक्षता घ्यावी लागणार आहे. चंदगड येथील पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात कोणत्या व्यक्ती आल्या आहेत. काय याचा शोध घेण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरु आहे. आता शहराच्या खबरदारी साठी नगरपंचायतीला अत्यंत दक्षतेने कार्यवाही करावी लागणार आहे. त्याच बरोबर नागरिकांनाही दक्षता घेणे गरजेचे आहे. 


No comments:

Post a Comment