सरपंच परीषद मुंबई महाराष्ट्रच्या आजरा तालुका संघटनेच्या वतीने आजरा कोवीड सेंटरला गिझरची मदत - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2020

सरपंच परीषद मुंबई महाराष्ट्रच्या आजरा तालुका संघटनेच्या वतीने आजरा कोवीड सेंटरला गिझरची मदत

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आजरा तालुका संघटनेकडून कोविड सेंटरला गिझर प्रदान करताना मान्यवर
आजरा - सीएल. वृत्तसेवा 
         आजरा विभागाचे प्रांताधिकारी  संपत खिलारे यानी कोवीड सेंटर साठी मदतीचे आवाहन केले होते.त्या अनुशंगाने कोव्हिडं सेंटर येथे येणाऱ्या लोकांना  पिण्यासाठी व अंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून देण्यासाठी गिझर ची आवश्यकता असल्याने सरपंच परीषद मुंबई महाराष्ट्र च्या आजरा तालुका संघटनेच्या वतीने आजरा कोवीड सेंटरसाठी  गरम पाणी करणारे गिझर प्रदाण करण्यात आले.
         या पुढेही प्रशासनाने मदतीचे आवाहन केलेस सरपंच संघटना  मदत करण्यास तयार आहे असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.तहसिदार  विकास आहिर यानी आजरा तालुक्यातील कोरोना साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात सरपंच ग्रामदक्षता कमीटीच्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले.तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे तालुक्यात कोरोना रोखू शकलो . यापुढे सर्वांनी जागरूक राहून तालुका सुरक्षित ठेवण्यासाठी काम करुया असे म्हणाले.पोलीस निरीक्षक भांगे यांनी एक गाव एक गणपती करण्यासाठी प्रयत्न करावेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या तालुक्यात प्रत्येक गावात एकच सार्वजनिक गणपती विराजमान करून एक आदर्श निर्माण करू असे आवाहन करण्यात आले. त्यास सरपंच संघटनेच्या वतीने  सर्व प्रकारचे सहकार्य करणार असे सांगितले.  कर्तव्यदक्ष अधिकारी तहसीलदार विकास आहीर, पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, गटविकास अधिकारी वाघ साहेब,मराठा महासंघाचे अध्यक्ष मारुतीराव  मोरे ,प . महाराष्ट्र कार्याध्यक्ष काशिनाथ तेली, राज्य कार्यकारिणी सदस्य राजू पोतणीस, जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी सरदेसाई, तालुका अध्यक्ष लक्ष्मण गुंडाळूकर, उपाध्यक्ष सुनील देसाई  तालुका कार्याध्यक्ष संतोष बेलवाडे, सचिव शंकर कुराडे, महिला उपाध्यक्षा मनीषा देसाई, दिपक देसाई,अमोल बांबरे, सचिन उतूरे, नामदेव जाधव , महेश कांबळे , जयवंत सुतार, वसंत देसाई,, रंजना बुगडे, सविता गुरव, महादेव पाटील, धनाजी सुतार, प्रभाकर कुंभार , शंकर संकपाळ, सुरेश गिलबीले, गजानन देशपांडे, वकील धनाजी देसाई, पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment