कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्ह्यात स्थानिक रूग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार दि . २० ते रविवार २६ जुलै कालावधीत कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे . पर जिल्ह्यातून शहरी व ग्रामीण भागातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येण्यार्या साठी दैनंदिन किंवा इतर स्वरुपातील प्रवासाचे कोणतेही ई परवाने , इतर परवानग्या आजपासून शनिवार दि.१८जुलै पासून पुढील दोन आठवड्यांसाठी देऊ नयेत , असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस प्रमुख,महापालिका आयुक्त ,याना पाटवले आहे.जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे यामुळे इतर जिल्ह्यातील मालवाहतूक व अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय तातडीस सूट असलेल्या व्यक्ती आणि वाहने वगळता इतरांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे . या पत्रात म्हटले आहे की , राज्याच्या विविध भागात लॉकडाऊनमध्ये अडकलेले प्रवासी , विद्यार्थी , कामगार इत्यादींना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी जिल्हाधिकारी , महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्याकडून ई परवाने दिले जातात . परंतु ,सद्य : स्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात वास्तव्य नसणाऱ्या व्यक्तींना देण्यात येत आहेत असे निदर्शनास आले आहे . कोल्हापूर जिल्ह्यात २० जुलैपासून लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे . त्यामुळे इतर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येण्यासाठी दैनंदिन किंवा इतर स्वरूपातील प्रवासाचे कोणतेही ई परवाने , इतर परवानग्या आजपासून पुढील दोन आठवडे कालावधीसाठी देण्यात येऊ नयेत . केवळ वैद्यकीय तातडीची खात्री झाल्यास व सदर व्यक्ती आपल्या क्षेत्रातील रहिवासी असल्यासच ( आधारकार्ड पत्यानुसार ) परवानगी देण्यास हरकत नाही . त्याचप्रमाणे यातून मालवाहतूक व अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय तातडीस सुट असलेल्या व्यक्तीना व वाहनांना सूट असेल . उपरोक्त परिस्थितीचा विचार करता सद्य : स्थितीत अपवाद वगळता कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी व्यक्ती व वाहनांना देण्यात येणारे कोणत्याही प्रकारचे प्रवासी परवाने देण्यात येऊ नयेत .असे नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment