अखेर कोवाड ला कोरोनाने गाठलेच...कायम गजबजणारी बाजारपेठ काही मिनिटात झाली सामसूम - चंदगड लाईव्ह न्युज

19 July 2020

अखेर कोवाड ला कोरोनाने गाठलेच...कायम गजबजणारी बाजारपेठ काही मिनिटात झाली सामसूम

कोवाड / सी एल वृत्तसेवा ( संजय पाटील )
 अडकूर , तांबूळवाडीत कोरोणाचा विस्फोट झाला . यानंतर दोन्ही गावे अनेक दिवस  सिल करण्यात आली आहेत . पण याचा जराही धडा न घेता कर्यात भागातील २०ते ३० गावांची मध्यवर्ती असणारी कोवाड बाजारपेठ मात्र कोणत्याही नियमांचे पालन न करता चालूच होती. अखेर आज दुपारी कोवाड मधील दोन रुग्णांचा अहवाल पॉजिटिव्ह आल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात कुणालाही न जुमानणारी बाजारपेठ सुन्न झाली आणि काही कळायच्या आत बंद सुद्धा झाली.
  जगण्याची धडपड करताना खरच कोवाडकर मृत्यूला आमंत्रण देत आहेत का ? असाच प्रश्न बाजारपेठेतील दृष्य पाहून गेल्या काही दिवसांपासून पडत होता .
          सुरवातीला कडक लॉकडॉऊनची बंधने पाळणारी कोवाड बाजारपेठ सध्या मात्र कोरोना संपल्याप्रमाणे भासत होती.बाजारपेठ ३ जूलै ते १० जूलै पर्यंत कडक बंद होती .यानंतर नियम शिथिल झाले आणि कोवाड बाजारपेठेचा बाजारच झाला .आओ जावो घर तुम्हारा , प्रमाणे अनेक जणांचा विना मास्क वावर चालू होता .सोशल डिस्टन्स चा तर इथं मागमूसही दिसत नव्हता.बाईक वरून तीन तीन जण अगदी बिनधास्त फिरताना दिसत होते ..व्यापाऱ्या मध्ये तर व्यवसायासाठी जणू स्पर्धा च चालू होती. कोरोना गांभीर्याने न घेतल्याचे चित्र सगळीकडे बघायला मिळत होत .लॉक डाऊन ची घोषणा झाल्यावर तर येथे गर्दीने ऊच्चांक गाठला होता. बाजरपेठ सनासारखी फुलली होती. येथील परिस्थितीवरून वाटत होतं कि असच चित्र राहील तर कोवाड चे अडकुर आणि तांबुळवाडी व्हायला वेळ लागणार नाही.
अखेर आज दुपारी दोन रुग्णाचे अहवाल पॉजिटिव्ह आले आणि संपूर्ण गाव हादरले.माणगाव आरोग्य केंद्रामध्ये  असलेल्या कर्मचाऱ्याचा अहवाल हा आजच्या रिपोर्ट मध्ये 
पाजिटीव्ह आला असून त्याच्या बरोबर त्याच्या पत्नीचाही अहवाल पोजिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात वाढणाऱ्या स्थानिक रुग्णाच्या पासून कर्यात भाग अपवाद राहिला होता. ते म्हणजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानी . पण आज आढळलेला रुग्ण जरी माणगाव आरोग्य केंद्रातील असला तरी ती व्यक्ती कोवाड ला रहात होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने कर्यात भागातील लोक यापुढे तरी धडा घेणार का ? हा  प्रश्न या ठिकाणी अधिरेखीत होत आहे.सोमवार पासून जिल्ह्यात लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची सवय लावून घेण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.


No comments:

Post a Comment