कोल्हापूर/प्रतिनिधी :--- रक्षाबंधन निमित्ताने कोल्हापूर डाक विभागाने 2 ऑगस्ट रोजी रविवारी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे भाऊ-बहिण कंटेन्टमेंट झोन किंवा सीलबंद इमारतींमध्ये रहात असल्याने एकाच शहरात असूनही अनेकांना आपल्या भावंडांना भेटता येणार नाही. सोमवारए, दिनांक 3 ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने त्यांना आपल्या भावाला राखी बांधणेही शक्य होणार नाही. यासाठी पोस्ट विभागाने “स्पीडपोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात आनंद निर्माण होईल” अशा घोषवाक्याने सर्वांना आनंद देण्यासाठी राखी टपालाचे संकलन, प्रसार व वितरण यास प्राधान्य दिले आहे.
No comments:
Post a Comment