पाठलाग करुन चंदगड पोलिसांनी पकडलेली गोवा बनावटीची दारु. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड पोलिसांनी बोलेरो पीक अप गाडीतून गोवा बनावटीची अवैद्य दारूची विना परवानगी आड मार्गाने वहातूक करणार्या गाडीचा पंधरा कि.मी.थरारक पाठलाग करत कोरज- कोनेवाडी दरम्यान तांम्रपर्णी नदीच्या पुलावर पकडली. दोन लाख दहा हजार सहाशेह रुपये किंमतीची बाँम्बे राँयल व्हिस्की ३९बाँक्स व तीन लाख रुपये किंमतीची बोलेरोसह पाच लाख दहा हजार सहाशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
चंदगड पोलीस ठाण्यात डायरीला नियमितपणे काम पाहणाऱ्या काँ.रुबीना खुदबुद्दिन पटेल यांना पारगड-वाघोत्रे-ईसापूर मार्गाने गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जाणार असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली होती. पटेल यांनी याबद्दल त्वरित चंदगडचे पोलीस निरीक्षक अशोक सातपुते यांना ही माहिती सांगितली. क्षणाचा विलंब न लावता पो.नि.सातपुते यांनी आपल्या काही निवडक सहका-यांना रवाना केले गुरुवारी मध्यरात्री तालुक्यातील ठिकठिकाणी गस्तीवर असलेल्या पोलिसांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या. दरम्यान पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास वाघोत्रे येथील मंदिराच्या जवळपास खाजगी वाहणासह थांबलेल्या पोलिसांना बोलेरो पीकअप येत असताना दिसले गणवेशात असलेल्या पोलीस काँ.अनिल अष्टेकर यांनी या वाहनाला हात करून थांबवण्यासाठी इषारा केला पण बोलेरो चालकाने वाहन अतीवेगाने पुढे नेले. त्यानंतर पोलिसांनी बोलोरोचा थरारक पाटलाग सुरु केला. बोलेरो चालकाने हेरा गावातून नांदवडे अशा आडमार्गाने आपली गाडी पळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवला आता बोलेरो चालक आडमार्गाने कोनेवाडी-कोरज दरम्यान फाट्यावरून बेळगाव--वेंगुर्ला या मुख्य रस्त्यावर जाईल हे लक्षात घेऊन पोलिसांनी याच हद्दीत रात्रीच्या गस्तीवर असलेल्या सहा.फौजदार एम.बी.मुजावर व सहा.फौजदार अर्जुन जाधव यांना दीली. यावेळी हे सर्वजण कोरज जवळ ताम्रपर्णी नदी वर असलेल्या पुलावर आपल्याकडे असलेल्या शासकीय गाडी रस्त्यावर थांबवून उभे राहिले दरम्यान दारु वाहतूक करणारे बोलेरो हे वाहन जवळ आले असता पुढे जाण्यारा रस्ता पोलिसांनी आडवला आहे मागे जायाचे तर पाठलाग करत येणारे पोलिसांचे खाजगी वाहन असल्याने अखेर बोलेरो चालकाने गाडी थांबवली यावेळी पोलिसांनी पांढऱ्या रंगाची बोलेरो (एम एच १२.के ऐ. ८५५३)सह चालक संदिप बबन सानप ( वय-२७) व सोबती संदिप रावसाहेब सानप(वय २२) रा.दोघेही रा,महेकेरी ता.जि.अहमदनगर याना मुद्देमालासह ताब्यात घेऊन पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी दोन लाख दहा हजार सहाशेह रुपये किंमतीची बाँम्बे राँयल व्हिस्की ३९बाँक्स व तीन लाख रुपये किंमतीची बोलेरोसह पाच लाख दहा हजार सहाशे रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन रितसर कारवाई केली पो.नि.अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.किल्लेदार अधिक तपास करत आहेत.
बातमीदार - अनिल धुपदाळे, चंदगड प्रतिनिधी
No comments:
Post a Comment