हलकर्णी(ता.चंदगड)येथील दौलत साखर कारखान्यात मिल रोलरचे पूजन करताना उत्तम देसाई, बाजूला पृथ्वीराज खोराटे, धीरजकुमार, गुंडू गावडे आदी. |
चंदगड /प्रतिनिधी
सन 2021मध्ये होणार्या हंगामासाठी देखभाल दुरूस्तीची अंतर्गत कामे पुर्णत्वास आली असून या हंगामात दौलत-अथर्व जोमाने सुरू करण्यासाठी व्यवस्थापनाने जोरदार तयारी सुरु केली आहे.आज कारखाना कार्यस्थळी हंगाम 2020-21 मधील पहिल्या मील रोलर पुजन कार्यक्रम कारखान्याचे जेष्ठ कर्मचारी उत्तम पांडूरंग देसाई यांचे शुभहस्ते .अथर्वचे पृथ्वीराज खोराटे, मुख्य कार्यकारी अधिकारी धिरजकुमार माने यांचे उपस्थित पार पडला . येणाऱ्या गळीत हंगामासाठी 10033 हेक्टर ऊसाच्या नोंदी घेणेत आल्या आहेत व त्यापासून कारखान्याने हंगाम 2020-21 करीता 6 लाख मे.टन ऊस गाळपाचे उददीष्ट ठेवले आहे . त्यासाठी आवश्यक तोडणी वाहतुक यंत्रणेचे करार केले असून , आवश्यक त्या अॅडव्हान्स रक्कमा त्यांना अदा केल्या आहेत . हंगाम सुरु झालेपासून क्षमतेनुसार गाळपासाठी ऊस आणनेचे नियोजन करणेत आले असून कारखान्याने गत हंगामातील सर्व देय असणाऱ्या रक्कमा शेतकरी व ऊस तोडणी ओढणी मजूरांना यापूर्वीच अदा केलेल्या आहेत . त्यामुळे सर्व ऊस उत्पादकांनी आपला पिकविलेला संपुर्ण ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे असे अवाहन याप्रसंगी करणेत आले . यावेळी जनरल मॅनेजर ( टेक ) , चिफ केमिस्ट , प्रशासकीय अधिकारी , मुख्य शेती अधिकारी , फायनान्स मॅनेजर , लेबर ऑफिसर तसेच मिल विभागाचे गुंडू गावडे , सुरेश भातकांडे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment