कागणी येथे माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

31 July 2020

कागणी येथे माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

कागणी : वृक्षारोपण प्रसंगी उपस्थित शुभम देसाई, दीपक शहापुरकर व अन्य माजी विद्यार्थी.
 कागणी : सी. एल. वृत्तसेवा
 कागणी (ता. चंदगड) येथील व्ही. के. चव्हाण-पाटील हायस्कूलच्या 2010 सालच्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण केले.  गावातील प्राथमिक उपकेंद्र तसेच ब्रह्मदेव मंदिर, हायस्कूल परिसरात बेल, रेनट्री, कडुनिंब, वड, गुलमोहर, माकड, जांभूळ, सावर आदी झाडे लावण्यात आली.
यावेळी दिपक शहापूरकर, शुभम देसाई, अविनाश खाडे, दयानंद सिदगोंड, सूरज देसाई, बापूसो देसाई, अमोल शहापूरकर, लक्ष्मण परीट, आकाश भोगण, सतबा शहापूरकर, अभय देसाई, विनोद कांबळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment