पोरेवाडी येथील शेतकऱ्याच्या मुलाने मिळवली इंजिनिअरिंगमधून पीएचडी, प्रा.पाटील यांच्या निबंधाला गुवाहाटी आयआयटीकडून मंजुरी - चंदगड लाईव्ह न्युज

25 July 2020

पोरेवाडी येथील शेतकऱ्याच्या मुलाने मिळवली इंजिनिअरिंगमधून पीएचडी, प्रा.पाटील यांच्या निबंधाला गुवाहाटी आयआयटीकडून मंजुरी

प्रा. गुंडोपंत राजाराम पाटील
नंदकुमार ढेरे / चंदगड - प्रतिनिधी
        पोरेवाडी (ता. चंदगड) या छोट्यासा गावात शेतकऱ्याचा घरी जन्म घेऊन स्वताःच्या हूशारीवर बी. ई., एम. ई, पदवी मिळवणाऱ्या प्रा. गुंडोपंत राजाराम पाटील यांनी गुवाहाटी आयआयटी विद्यापीठाची पीएचडी पदवी संपादन केली आहे. प्रा. पाटील यांनी 'इव्हॅल्युशन ऑफ स्लोप बॉटम ट्युन्ड लिक्वीड डॅम्पर्स इन रिडक्शन ऑफ अर्थक्वीक व्हायब्रेशन ऑफ स्ट्रक्चर` या विषयामध्थे हि पीएचडी पदवी मिळवली आहे.  
        पुणे येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अध्यापन करीत असताना प्रा गूडोपंत पाटील यानी वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी हे यश संपादन केले. दुर्गम खेड्यातील प्रा. पाटील यांचे हे यश डोंगराएवढे मोठे आहे. प्रा. पाटील यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण गावात झाले. पाचवी ते सातवीपर्यंत आमरोळी, नववीपर्यंत अडकूर, तर दहावीची परीक्षा नेसरी येथील एस. एस. हायस्कूलमधून उत्तीर्ण केली. गडहिंग्लज येथील साधना कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण झाल्यावर क-हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. सिव्हील पदवी मिळवली. बेंगलोर-येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम. ई. ची. पदवी. संपादन केली. गुंडोपंत पाटील त्यानंतर ते पुणे येथील एका इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.अध्यापनातील कौशल्याबद्दल त्यांना १ ९९९ ला इंटरनॅशनल पब्लिशिंग हाऊसचा बेस्ट सिटिझन ऑफ इंडिया पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान  पीएचडीसाठी त्यांनी ' इव्हॅल्युशन ऑफ स्लोप बॉटम ट्युन्ड लिक्वीड डॅम्पर्स इन रिडक्शन ऑफ अर्थक्वीक व्हायब्रेशन ऑफ स्ट्रक्चर हा विषय निवडला होता. प्रा. पाटील यांच्या निबंधाला गुवाहाटी आयआयटीकडून मंजुरी मिळालीआहे. पाटील यांना प्रा. के. डी. सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment