हलकर्णी फाट्यावर व्यापारी नागेश चौगुले यांच्याकडून मोफत भाजीपाल्याचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

04 July 2020

हलकर्णी फाट्यावर व्यापारी नागेश चौगुले यांच्याकडून मोफत भाजीपाल्याचे वाटप

नागेश चौगुले

दौलत हलकर्णी
         हलकर्णी फाटा (ता.चंदगड ) येथील भाजी व्यापारी नागेश चौगुले यांनी लॉकडाऊच्या काळात नागरिकांना पालेभाजी वाटुन जपली सामाजिक बांधिलकी.
            श्री. चौगुले हे गेल्या वीस वर्षापासुन हलकर्णी फाटा येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. वेळोवेळी त्यांचा गणेश उत्सव तसेच इतर सार्वजाणिक कामात सहभाग असतो. गेल्या दोन दिवसापुर्वी हलकर्णी येथील दौलत कारखाण्याच्या वसाहतीस लागुन असलेल्या सावंत वसाहतीत कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने शुक्रवारपासुन हलकर्णी फाट्यावरील बाजारपेठ पुर्णता लॉक डाऊण करण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. सर्व दुकाने बंद असल्याने रोजच्या घरी रोजच्या आहारातील भाजीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. अशातच चौगुले यांच्या दुकानात विक्रीसाठी असणारी पालेभाजी फाट्यावरील जवळपास दहा ते बारा कुटुबांना चार दिवस पुरेल इतकी भाजी मोफत देऊन सामाजिक बांधीलकी जोपासली.
            लॉकडाऊनच्या काळात देखिल टोमॅटो, भेंडी, कारले, शेवगा, वांगी अशी वेगवेगळा भाजीपाला जाधव येथील परिवाराने मोफत दिल्याने सर्वांणी त्यांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment