नागरिकांनी साथ दिली तर अडकुर व मुगळी कोरोनामुक्त होईल - डॉ.बी डी सोमजाळ - चंदगड लाईव्ह न्युज

04 July 2020

नागरिकांनी साथ दिली तर अडकुर व मुगळी कोरोनामुक्त होईल - डॉ.बी डी सोमजाळ


    चंदगड/प्रतिनिधी:--  एक आठवड्याच्या कालावधीत कोरोना संक्रमित झालेले १५ रुग्ण सापडलेले आहेत त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे.अडकुर येथील २७५ व मुगळीतील ५० संशयीत रुग्णांना चंदगड येथील कोविड सेंटरमध्ये तपासण्या करून ठेवण्यात आलंय.
       परिसरातील नागरिकांना आवाहन करताना डॉ. बी डी सोमजाळ म्हणाले की शासनाने दिलेल्या नियमांचे  पालन करावे,सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे.सद्यस्थितीत प्रशासनावर मोठा ताण आहे.आरोग्य विभाग व स्वता २४ तास कार्यरत आहे.अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स,व शिक्षक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू आहे.परिसरातील सरपंच व पोलीस पाटील यांच्यामार्फत जागृतीचे काम सुरू आहे.नागरिकांनी विनाकारण इतरांना त्रास होईल असे वर्तन करू नये. आरोग्य लाखमोलाचे आहे प्रत्येकाने आपली भूमिका पार पाडली पाहिजे जेवणावळी, कट्ट्यावर बसणे टाळावे. कोरोना विषाणूला गर्दी फार आवडते गर्दीतच तो मिसळतो व आपल्या व इतरांच्या आरोग्यासाठी धोकादायक होतो. यासाठी गर्दी टाळा व प्रशासनाला सहकार्य करा नक्कीच कोरोनाला हद्दपार करू असे ठामपणे सांगितले. कोरोना प्रतिबंध उपाय म्हणून सर्दी ,खोकला व ताप दिन दिवसांपेक्षा अधिक असेल  तर आरोग्य खात्याशी व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स  यांच्याशी तातडीने संपर्क करावा असे आवाहन डॉ. बी डी सोमजाळ यांनी केले आहे.


बातमी सौजन्य - तातोबा गावडे, अडकुर

No comments:

Post a Comment