चंदगड/प्रतिनिधी:----कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता ग्रामीण भागात ही दक्षतेचे पाऊल उचलले जात आहेत. या पार्श्वभूमीवर चंदगड शहरातील गुरुवार पेठ,रामदेव गल्ली व शिवाजी गल्ली ही तीन ठीकाणे प्रतिबंधक म्हणून प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी आज घोषित केले आहे. या तीन्हीही ठिकाणी आता प्रशासनाने दक्षता घेत या ठिकाणच्या सील बंदीचा आदेश जारी केला आहे .
चंदगड तालुक्यातील कोरोनाचे रूग्न दिवसेंदिवस वाढत आहेत.चंदगड शहरात गुरूवार पेठे,रामदेव गल्ली, शिवाजी गल्ली ही तीन ठिकाणे प्रतिबंधक क्षेत्र म्हणून प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी घोषित केले आहे.या तीन्हीही ठिकाणी चारही बाजूने सील करण्यात याव्यात व काटेकोर अंमलबजावणी स्थानिक पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन आणि नगर पंचायत प्रशासनाने यथायोग्य खबरदने कार्यवाही करण्यासाठी अधिकार दिले आहेत. तर अंत्यत महत्वाचे असेल तरच नागरीकांनी बाहेर पडावे असे सुचित केले आहे. कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन होणार नाही याची सर्वानी दक्षता घ्यावी असेही आदेशात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment