चंदगड कोरोना रुग्णांची शंभरी पार चंदगडकरानी सतर्क राहणे गरजेचे - चंदगड लाईव्ह न्युज

04 July 2020

चंदगड कोरोना रुग्णांची शंभरी पार चंदगडकरानी सतर्क राहणे गरजेचे


तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा -संजय पाटील
 आज चंदगड तालुक्याला पून्हा एकदा मोठा धक्का बसला . आज दि ४ जुलै रोजी सायंकाळी  ६ वाजता आलेल्या अहवालानुसार चंदगड तालूक्यातील १० अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालूक्यातीत कोरोना रुग्णांच्या संख्येने शतक पार केले .आज १०५ रुग्णसंख्या झाल्याने चंदगड करानी खूपच सतर्क राहणे गरजेचे बनले आहे . यापैकी २७ रूग्ण स्थानिक असल्याने धोका वाढत चालला आहे .
       चंदगड तालूक्यात कोराणाचा हॉट स्पॉट बनलेल्या अडकूरमध्ये आज पून्हा सहा रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर येथून जवळच असलेल्या मुगळी मध्ये पून्हा आज तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला . अडकूरची आतापर्यंतची अॅक्टीव्ह रुग्ण संख्या 15 असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे . अडकूरची रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने व सर्व रुग्ण स्थानिक असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे . मात्र येथील वैद्यकिय अधिकारी डॉं . बी .डी. सोमजाळ यानी या अगोदरच संबधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्याना चंदगडला कोरंटाईन केले असल्याने यामधीलच आज सहाजन पॉझिटिव्ह आले आहेत . तर मुगळी येथील तीघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे . येथील रुग्णसंख्या ७ झाली आहे . तर ढोलगरवाडी येथे एका डॉक्टरचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने वैद्यकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे . काल शिनोळी येथील एका डॉक्टरला कोरोना बाधा झाली होती . त्यामूळे चंदगडला  सध्या २ डॉक्टर कोरोना बाधीत डॉक्टर आहेत . चंदगड तालूक्याच्या उत्तरेकडील पट्यातच मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने भितीचे वातावरण पसरले असले तरी नागरिक विना मास्क फिरत असल्याने धोका निर्माण झाला आहे . चंदगडची रुग्ण संख्या वाढत असल्याने व सध्या चंदगड तालूक्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाने व चंदगड तालूक्यातीत ग्रामस्थानी सतर्क राहणे खूपच गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment