![]() |
मलगेवाडी फाटा येथील याच रस्त्यावर दूचाकी वाहनांचे अपघात होत आहेत |
अडकूर - सी . एल . वृत्तसेवा
राज्य मार्ग क्र .१२९ ला जोडणारा मलगेवाडी फाट्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत . त्यामूळे मलगेवाडी ( ता. चंदगड ) फाटा अपघातांचा हॉट स्पॉट बनला आहे .
सध्या गडहिंग्लज तालुका हद्द ते अडकूर पर्यंत च्या राज्य मार्ग क्र .१२९ च्या डांबरीकरणाचे काम चालू आहे . रस्ता रुंदिकरणासह डांबरीकरण चालू असल्याने काही ठिकाणी अर्धाच रस्ता वाहतूकीसाठी खुला आहे . अर्धा रस्त्यावर डांबर टाकले असल्याने तो उंच बनला आहे . दिवासा दूचाकीचा वेग जास्त असल्यास अचानक समोर उंच असलेल्या रस्त्यावर गाडी गेल्यास ती सरकून पडत आहे तर रात्रीच्या अंधारात वाहनधारकाला अंदाज न आल्याने येथे उभारलेल्या चेक पोस्ट भागातच अपघात होत आहे .एखादा मोठा अपघात होण्यापूर्वीच संबधीत विभागाने याची दखल घेण्याची मागणी प्रवाशी वर्ग व वाहनधारकानी केली आहे .
.
No comments:
Post a Comment