चंदगड-जांबरे परिसर मोबाईल नेटवर्क सुविधापासून वंचित - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2020

चंदगड-जांबरे परिसर मोबाईल नेटवर्क सुविधापासून वंचित


दौलत हलकर्णी
             चंदगड तालुक्यातील देसाईवाडी-जांबरे या भागातील कित्येक गावे हि नेटवर्कपासून वंचित आहेत त्यामुळे येथील लोकांचे जीवनमान हे आजही सुधारले नाही ,अनेक समस्यांना हि गावे तोंड देत आहेत.आडुरे ,कोकरे,किरमटेवाडी ,न्हावेली ,माळी,पेडणेकरवाडी ,उमगाव ,सावतवाडी,खळणेकरवाडी ,जांबरे इत्यादी गावे असून जंगली,डोंगरालगत हा भाग आहे. दळणवळणाच्या सुविधा सुधारल्या नाहीत ,आरोग्यविषयक सुविधा अपुऱ्या आहेत .त्यामुळे येथील लोकांची मोठी कसरत होत आहे.या भागातील लोकांना बाहेरील गावी या तालुक्यात संपर्क होत नाही.कारण या भागात नेटवर्कचा अभाव आहे .कोणताही टौवर या सर्व भागामध्ये नाही त्यामुळे अनेक अडचणी लोकांना येत आहेत .डोंगर व जंगली भाग असल्यामुळे येथे सार्वजनिक आपत्ति ,जीवितहानी होते.तसेच अडचणीच्या,संकटाच्या काळात कोणाचाही संपर्क होत नाही , त्यामुळे शासनाकडून  लवकरात लवकर या  मागण्याची दखल घेतली जावी अशी येथील जनतेची विनंती आहे.

No comments:

Post a Comment