चंदगड तालुका लॉक डाऊन करण्याची सरपंच संघटनेने केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2020

चंदगड तालुका लॉक डाऊन करण्याची सरपंच संघटनेने केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी


तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा

चंदगड तालूक्यात वाढते कारोना  रूग्ण चिंताजनक आहेत . त्यामूळे या रोगाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी  संपूर्ण चंदगड तालूकाच लॉक डाऊन करण्यात यावा अशी मागणी संपूर्ण( चंदगड तालूका सरपंच संघटनेने जिल्हाधिकारी  दौलत देसाई यांचेकडे केली आहे .
 निवेदनात म्हटले आहे की ,चंदगड तालुक्यात सध्या आरोग्य व्यवस्था कशी आहे हे आपणाला ज्ञात आहेच. तरी सध्याची स्थिती खुप चिंता जनक आहे. चंदगड तालुक्यातील सरपंच यांनी जबाबदारी कशी पार पाडायची याचा मोठा प्रश्न आहे. शासकीय यंत्रणा आम्हा सरपंचावर जबाबदारी ढकलत आहे.  तसेच सर्वच  लोकांच्या रोषाला सरपंच बळी पडत आहेत. याची कारणे आपल्याला माहिती आहेतच यात तिळ मात्र शंका नाही . गावात कोरोना पॉझिटीव्ह संख्या वाढल्यास जबाबदार दक्षता कमिटी म्हणता पण याच काळात दक्षता कमिटीत काम करणाऱ्या शासकीय कर्मचारी वर्ग मात्र निवांत आहेत असे वाटत आहे. सर्व जबाबदारी अध्यक्ष यांची आपण म्हणत आहात .. मग याच अध्यक्ष या नात्याने आम्ही सर्व सरपंच बंधू भगिनी आपल्याला निवेदन देत आहोत . पुढील पंधरा दिवस चंदगड तालुका संपूर्णपणे बंद करण्यासाठी आपण आदेश काढावा. यामध्ये पेट्रोल पंप व इतर ज्या सुविधा आहेत की ज्यामुळे सुसाट फिरणाऱ्याना आळा बसेल व तालुक्यातील कोरोना संसर्ग वाढण्याची साखळी तुटेल. यामुळे चंदगड तालुका भविष्यात देखील आरोग्याच्या बाबतीत चांगला राहील.
कृपया आपण चंदगड तालूका पूर्णपणे लॉक डाऊन करावा . अशी मागणी करण्यात आली असून निवेदनावर सरपंच संघटनेचे अध्यक्षरामभाऊ पारसे , उपाध्यक्ष रमेश भोसले ,कार्याध्यक्ष एकनाथ कांबळे ,सचिव डी .जी. नाईक सहसचिव  नरसिंगराव पाटील या सरपंचासह इतर सरपंचांसह इतर सरपंच वर्गाचा सह्या आहेत .

No comments:

Post a Comment