तालूक्यात आज पुन्हा ६ रूग्ण सापडले, शिनोळी येथील डाॅक्टरच्या संपर्कातील ७० जण निगेटिव्ह - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2020

तालूक्यात आज पुन्हा ६ रूग्ण सापडले, शिनोळी येथील डाॅक्टरच्या संपर्कातील ७० जण निगेटिव्ह


चंदगड / प्रतिनिधी:-- शिनोळी व ढोलगरवाडी येथील   डॉक्टरना कोरोनाची लागण झाली आहे ,  हलकर्णी ( ता . चंदगड ) येथील एका कर्मचार्यालाही कोरोनाशी लागण झाली आहे. डॉक्टरांच्या संपर्कात अनेकजण आहेत.शिनोळी येथील डाॅक्टरच्या संपर्कातील २४०नागरिकांचे स्बॅब तपासणी साठी घेतले होते, त्यांच्यापैकी आज ७०जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डाॅ आर के खोत यानी दिली.  ढोलगरवाडी येथील डाॅक्टरच्या   संपर्कात नेमके किती जण संपर्क आहेत याची माहिती घेण्याचे काम डाॅ अरविंद पठाणे यांच्या पथकाद्वारे सूरू आहे   संपर्काची मोठी साखळी विचारात घेता प्रशासन हादरले आहे .दरम्यान चंदगड तालुक्यात आज पुन्हा सहा नवीन पाॅझीटीव्ह रूग्ण सापडले आहेत. शिनोळी खुर्द-२, मोरयाची वाडी २, केरवडे-१,कानूर बुद्रुक-१ या गावातील हे रूग्ण आहेत.चंदगड तालुक्यात आज अखेर ११२रूग्ण सापडले आहेत, त्यापैकी रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी , असे आवाहन प्रांताधिकारी विजया पांगारकर यानी केले आहे .

No comments:

Post a Comment