हलकर्णी येथे रुग्णांच्या कुटुंबियांचे अहवाल निगेटीव्ह, धोका टळला - चंदगड लाईव्ह न्युज

06 July 2020

हलकर्णी येथे रुग्णांच्या कुटुंबियांचे अहवाल निगेटीव्ह, धोका टळला


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
         हलकर्णी (ता. चंदगड ) येथे सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने परीसरात समाधान व्यक्त होत आहे. शिनोळी व ढोलगरवाडी येथील डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने त्यातच हलकर्णी येथील बाधितरुग्ण हलकर्णी फाट्यावरील पार्वती हॉस्पीटलच्या डॉ. रवी पाटील यांच्या सपंर्कात आल्याच्या अफवेमुळे फाटा परीसर तसेच परीसरातील गावांमध्ये भितीचे वातावर होते. पण डॉ. पाटील यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्व:स सोडला.
           पसरलेल्या अफवेमुळे डॉ. पाटिल यांनी नागरीकांचा विचार करुण स्वतःच चंदगड येथे जाऊन आपला स्वॅब देऊन स्वतःला होम क्वांरटाईन करुण घेतले. पाटिल याच्याकडे तपासणीसाठी गेलेल्या पेशंटचे धाबे दणाणले होते. अहवाल येईपर्यंत दोन दिवस चिंतेत असल्याचा डॉक्टरांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वांचा जीव भाड्यांत पडला.


No comments:

Post a Comment