महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील केएलईएस रुग्णालयाचा समावेश, माजी आमदार श्रीमती कुपेकर व डाॅ. बाभुळकर यांच्या प्रयत्नांना यश - चंदगड लाईव्ह न्युज

06 July 2020

महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील केएलईएस रुग्णालयाचा समावेश, माजी आमदार श्रीमती कुपेकर व डाॅ. बाभुळकर यांच्या प्रयत्नांना यश


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
           सर्वसामान्य नागरीकांसाठी  वरदान ठरलेल्या महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे सीमाभागातील नागरिकांना फायदा होणार आहे. त्यामुळे सिमा भागात समाधान व्यक्त होत आहे.
            चंदगड तालुक्यातील नागरिकांचा जास्त करुण बेळगांवशी जास्त संपर्क आहे. शासकीय काम वगळता सर्व गोष्टींसाठी तालुक्यातील नागरीक बेळगांव गाठतात. आरोग्याच्या बाबतीत मात्र सर्वसामान्यांना गडहिंग्लज किंवा दिडशे किमीवर असणाऱ्या कोल्हापूर येथे जावे लागते. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी हे आर्थिक बाबींचा व सोयीच्या मानाने परवडणारे नव्हते. त्यामुळे बऱ्याच वर्षापासुन सर्वसामान्यांना परवडणाऱ्या महात्मा जोतीबा फुले आरोग्य योजना बेळगांव येथील हॉस्पिटलमध्ये व्हावी अशी सिमा भागातील नागरिकांची मागणी होती. यासाठी आमदार असतेवेळी श्रीमती संध्यादेवी कुपेकर व डॉ. नदांताई बाबुळकर यांनी केएलईच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल व मेडीकल रिसर्चसेंटर आणि केएलईएस कॅन्सर हॉस्पीटल याच्याकडे मागणी केली होती. त्याला सबंधीत केएलई हॉस्पिटलने मान्यता देऊन योजणे अंतर्गंत रुग्णांना सेवा देण्यास संमती दिली आहे. राज्याच्या सीमेलगतच्या भागातील रुग्णालयांचा समावेश या योजनेत झाल्याने सीमावासीय नागरिकांना त्याचा फायदा मिळेल. त्याबद्दल  सर्व पंचक्रोशीतुन समाधान व्यक्त होत आहे. 

1 comment:

Unknown said...

Aamhi khup prayatn kelo pan KLE wale bolat aahet ki hot nahi, plz suggest solution

Post a Comment