हंदेवाडीतील श्रद्धा फौंन्डेशनची मदत, ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2020

हंदेवाडीतील श्रद्धा फौंन्डेशनची मदत, ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

हंदेवाडी (ता. आजरा) ग्रामपंचायतीला सॅनिटायझर देताना श्रद्धा फौंन्डेशनचे कार्यकर्ते
आजरा - सी .एल. वृत्तसेवा
         हंदेवाडी तालुका आजरा येथील श्रद्धा फौंन्डेशन ने कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत कोळीन्द्रे च्या पदाधिकारी आणि कर्मचारी याना मास्क व सॅनिटर प्रदान केले. गेले तीन महिने गावासाठी अहोरात्र काम करून कोरोणाला दूर ठेवणाऱ्या या पदाधिकारी व कर्मचारी यांची काळजी या फौंन्डेशनने घेतल्याने समाधान व्यक्त केले जात आहे . यावेळी सरपंच सौ सरिता उगाडे, संदीप उगाडे, श्री बोर, सर्व सदस्य,पदाधिकारी, कर्मचारी, फौंन्डेशनचे रोहन भालेकर, जाधव आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment