तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीच, आज शिनोळी खुर्द येथील नऊ रुग्णांची भर, रुग्णसंख्या 154 वर - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2020

तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीच, आज शिनोळी खुर्द येथील नऊ रुग्णांची भर, रुग्णसंख्या 154 वर

जिल्ह्यात सर्वांत जास्त रूग्ण सापडले शिनोळीत, शिनोळी १६ व तांबुळवाडीला १५ रूग्ण सापडले सामुहिक संसर्गाचा धोका वाढला
सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
        गेल्या आठवडाभरापासून चंदगड तालुक्यात स्थानिक संसर्ग वाढत आहे. आज सकाळच्या सत्रात शिनोळी खुर्द येथील 2 तर सायंकाळी आलेल्या अहवालामध्ये आणखी 7 रुग्णांची भर पडल्याने आज दिवसभरात 9 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे चंदगड तालुक्याची रुग्णसंख्या 154 वर पोहोचली आहे. 
       चंदगड तालूक्यात कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडण्याची साखळी दिवसेंदिवस वाढत आहे. आज अखेर जिल्ह्यात १६ इतके सर्वांधिक रूग्ण शिनोळीत व त्या पाठोपाठ १५ रूग्ण तांबूळवाडी येथे सापडले आहेत.रूग्ण सापडण्याचा सिलसीला दररोज वाढत,तालूक्यात समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. 
     चंदगड तालुक्यात काल कोरोना पॉझिटिव्ह रुग्णानी १५४ चा आकडा गाठला.आज दिवस भरात शिनोळी येथे ९ स्थानिक पहिला बळी गेल्याने तालुका आरोग्य प्रशासन यंत्रणेमध्ये खळबळ माजली होती.
   चंदगडमध्ये समूह संसर्गाचा धोका वाढत असल्याने  प्रशासनाने तालुक्यातील सर्व दुकाने बंद केली आहेत .कोरोणा रुग्ण असलेल्या गावात बंदी केली आहे . शिनोळी येथील एक डाॅक्टरच कोरोना पॉझिटीव्ह झाला.त्याच्या संपर्कात  १००हून अधीक पेंशट आले आहेत. त्यातच शिनोळी येथील दौलत मध्ये कामाला जाणार्या कर्मचार्याचा समावेश आहे.या कर्मचार्यामूळे दौलत कारखान्यात काम करत असलेल्या विभागातील हलकर्णी व तांबूळवाडी येथील कर्मचार्याना कोरोनाची  लागण झाली.पूढे हि साखळी अशीच वाढत गेल्याने तांबूळवाडी व हलकर्णी येथे पाॅझीटीव्ह रूग्ण सापडण्याची साखळी मोठ्या प्रमाणात सूरू आहे. ढोलगरवाडीतील एक डॉक्टरही कोरोना पॉझिटीव्ह असल्याने त्यांच्या संपर्कातील रूग्णना  प्रशासनाकडून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे . आता पर्यत तालुक्यात एकूण दोन डॉक्टर कोरणा बाधित झाले आहेत.या डॉक्टरकडे गेल्यास रुग्णांची संख्या मोठी असल्यामुळे समूह संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यातील अडकूर हॉटस्पॉट ठरले असून आतापर्यंत १६ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी  १स्थानिक रुग्ण या रोगाचा बळी ठरला. तालुक्यात आतापर्यंत १५४ कोरोना बाधित रुग्ण सापडले असून त्यापैकी निम्म्याहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.आता पर्यत 27 जनाना समूह संसर्गाची लागण झाली आहे. सामूहिक संसर्गाचा धोका वाढल्याने तालुका प्रशासनाने मोठा धस्का घेतला आहे.

             बातमीदार - नंदकुमार ढेरे, चंदगड प्रतिनिधीNo comments:

Post a Comment