सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
तालुक्यात कोरोणा रुग्णसंख्येने दिडशेचा टप्पा पार केला असून दौलत अथर्व साखर कारखान्यामध्ये असणाऱ्या कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग सुरू असल्याने हा कारखाना पुढील आठ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला आहे अशी माहिती दौलत अथर्वचे मुख्य प्रवर्तक मानसिंग खोराटे यांनी सांगितले.
चंदगड तालुक्यामध्ये सध्या कोरणा रुग्णांची संख्या दीडशे च्या जवळ गेली आहे.तालुक्यातील सामूहिक संसर्ग स्तोत्र वाढला असून दौलत अथर्व साखर कारखान्यामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करणारे 5 कामगाराना कोरोणाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्ती सध्या पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून सापडत आहेत. तालुक्यातील कोरोणा स्तोत्र असलेला दौलत अथर्व साखर कारखाना पुढील आठ दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय दौलत अथर्वचे मुख्य प्रवर्तक मानसिंग खोराटे यांनी घेतला आहे .तसेच सर्व कामगारांना त्यांच्या त्यांच्या गावांमध्ये कोरोनटाइन होण्याच्या सूचना दिल्या असून त्यांच्या स्व्ँब रिपोर्ट आल्याशिवाय त्यांना कामावर घेतले जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. चंदगड तालुक्यात कोरणा रुग्णांची संख्या १५४इतकी झाली आहे . हा वाढता प्रसार लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हा कारखाना पुढील आठ दिवसासाठी बंद ठेवण्यात येत असून काल प्रांताधिकारी विजया पांगारकर तहसीलदार विनोद रणवरे यांनी दौलत अथर्व प्रशासनाला या संसर्ग बाबत कळविले होते .त्याची दखल घेत दौलत अथर्वचे मुख्य प्रवर्तक मानसिंग खोराटे यांनी पुढील आठ दिवसासाठी कारखाना बंद ठेवत असून परिस्थिती बघून पुढील निर्णय घेण्यात येणार असेही श्री खोराटे यानी सांगितले.
बातमीदार - नंदकुमार ढेरे, चंदगड प्रतिनिधी
No comments:
Post a Comment