कोरोनाच्या सावटामध्ये नियम व अटीवर कोवाड बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी, ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समितीचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2020

कोरोनाच्या सावटामध्ये नियम व अटीवर कोवाड बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी, ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समितीचा निर्णय

कोवाड येथील बाजारपेठ. 
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
          संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात वाढत्या स्थानिक रुगणांच्या आकडेवारीमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.अशा परिस्थितीत काही कडक नियम व अटीवर अधीन राहून कर्यात भागातील 25 ते 30 खेडेगावासाठी मोठी असलेली कोवाड बाजारपेठ चालू करण्यास स्थानिक ग्रामस्तरिय समितीने परवानगी दिली आहे.
            तालुक्यातील हॉटस्पॉट ठरलेले अडकुर गाव कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असतानाच तांबुळवाडी येथे गेल्या चार दिवसात आढळलेल्या 15 रुग्णामुळे तांबूळवाडी हे गाव आता हॉटस्पॉट बनू पाहते आहे.
याबरोबरच कर्यात भागात काल सापडलेल्या कुदनूर आणि लकीकट्टे या गावात प्रत्येकी एक स्थानिक रुग्ण मिळाल्यामुळे कर्यात भागातील मोठी असलेल्या कोवाड बाजारपेठेत होणारी गर्दी कमी करण्यासाठी संभाव्य धोका  टाळण्यासाठी येथील ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समितीने पुढील नियमावली तयार करून या नियमांच्या अधीन राहून सर्व व्यापारी व नागरिकांना काळजी घेण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.
1.रोज सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत सर्व दुकाणे चालू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.या नियमांचे भंग करणाऱ्या व्यापाऱ्याला रु 2 हजार दंड बरोबरच संबंधित दुकान हे 5 दिवस सील करण्याचे आदेश दिले आहेत.
2.शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार सामाजिक अंतर राखून व्यवसाय करणेच आहे.
3.गावातील नागरिकासह व्यापाऱ्यांनी मास्क, सॅनिटाइझरचा वापर करणे बंधनकारक केले असून मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीस रु 200 दंड करण्यात येणार आहे.
4.दुकानदाराने आपल्या दुकानासमेरील प्रवेशद्वारावर नो मास्क ...नो एन्ट्री चा फलक लावणे बंधनकारक आहे.
5.बाजारपेठेत होणारी गर्दी रोखण्यासाठी भाजी विक्रेत्यांनी जुन्या धरणाशेजारी व फळ विक्रेत्यांनी घाटावरील जागे मध्ये आपली दुकाने मांडून व्यवसाय करणेचा असून रोज जातेवेळी आपली जागा स्वच्छ करणेचे आहे.
6.प्रत्येक गुरुवारी भरणारा आठवडी बाजार पुढील निर्णय होई पर्यंत बंद राहील तर त्या दिवशी जनता कर्फ्यु असून कोणीही अनावश्यक घराबाहेर पडणेचे नाही.
7.दूध डेअरी च्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क व हॅन्डग्लोव्ज वापरणे बंधनकारक असून प्रत्येक डेअरी समोर सॅनिटाइझर स्टँड ची व्यवस्था करणेचे आहे.
8 हॉटेल व्यवसाईकांनी बैठक व्यवस्था न करता फक्त पार्सलची व्यवस्था करण्याला परवानगी आहे. नियमांचे भंग केल्यास परवाना रद्द करण्याची संकेत दिले आहेत.
9.त्याबरोबरच सर्व दुकानदारांनी आपला माल सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत मागवून घेणे अथवा उतरून घेणेचा असून घरी किंवा अन्य कोणत्याही प्रकारे मालाची विक्री न करण्याबाबत कडक सूचना केल्या आहेत.
सद्यस्थितीत वरील सर्व नियमावलीचे काटेकोर पालन होणे गरजेचे असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध फौ जदारी दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तरी सर्व नागरिक व व्यापारी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच अनिता भोगण यांनी केले आहे.
                                                                                                                                                     बातमीदार -  संजय पाटील, कोवाड-प्रतिनिधी

No comments:

Post a Comment