दौलत कनेक्शनमुळे चंदगड तालुक्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढला. स्वॅब दिलेल्या व्यक्तींचाही जनतेत मोकाट वावर, दक्षतेची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2020

दौलत कनेक्शनमुळे चंदगड तालुक्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढला. स्वॅब दिलेल्या व्यक्तींचाही जनतेत मोकाट वावर, दक्षतेची गरज

कार्वे / सी. एल. वृत्तसेवा
              चंदगड तालुक्यात कोरना व्हायरसने आहाकार उडवला आहे पुणे -मुंबईहून तालुक्यात आलेल्या चाकरमान्यां मुळे कोरोना चा शिरकाव झाला असला तरी, त्याचे प्रमाण आटोक्यात होते. मात्र सध्या सुरू असलेले दौलत कनेक्शन चंदगड तालुक्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे. दौलत साखर कारखान्याच्या कामगारांच्या संपर्कात आलेले चंदगड तालुक्यातील किमान वीस जण कोरोना बाधित झालेले आहेत. शुक्रवारी व शनिवारी तालुक्यात पॉझिटिव्ह आलेले जवळपास सर्वच जण दौलत कनेक्शन मधील आहेत. त्यामुळे दौलत संचलित अथर्व शुगरच्या कामगारांच्या बाबतीतील सुरक्षेबाबत तालुक्यात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
                हलकर्णी येथील दौलतच्या सिव्हिल विभागात काम करणाऱ्या एका कामगारापासून या कनेक्शन ला सुरुवात झाली होती. त्याच वेळी दौलतच्या प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या असत्या तर आज ही परिस्थिती तालुक्यात उद्भवली नसती. तांबुळवाडी येथील बॉयलर विभागात काम करणारी व्यक्ती दौलत मधील दुसरी बाधित व्यक्ती ठरली. येथूनच परिस्थिती बिघडत गेली या कामगाराच्या संपर्कातील जवळपास पंधरा जण बाधित झाले आहेत. त्यामुळे या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. हलकर्णी फाटा, पाटणे पाट्या सह या परिसरातील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र दौलत येथील कामगार कामावर येत असल्याने व पुन्हा आपल्या आपल्या गावाकडे जात असल्याने यापुढे मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दौलतच्या सिव्हिल विभागात काम करणाऱ्या कुदनुर, लकीकट्टे व ढेकोळीवाडी येथील कामगार बाधित झाल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
     कामगारांच्या स्वॅब तपासणीची माहिती कुणालाच नाही
        दौलत मधील कामगार बाधित निघाल्याने त्यांच्या बाधीत निघाल्याने त्यांच्या संपर्कातील कामगारांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे स्वँब तपासणे गरजेचे होते. संपर्कातील कामगारांचे स्वँब घेण्यात आले, मात्र स्वँब घेतल्याची माहिती या कामगारांच्या गावात कोरोना दक्षता समितीला देण्यात आली नाही.स्वँब दिलेल्या कामगारांनी  स्‍वतः विलगीकरणात राहणे गरजेचे होते  मात्र असे घडले नाही. त्यांचा गेल्या दोन दिवसात गावांमधील अनेकांशी संपर्क आला असल्याने धोका पुन्हा वाढला आहे. यामुळे या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई करावी. विलास रेडेकर, उपसरपंच, ग्रामपंचायत, लकीकट्टे.
                                 बातमीदार - निवृत्ती हारकारे, कार्वे प्रतिनिधी

No comments:

Post a Comment