मजरे कार्वे / प्रतिनिधी सी एल न्यूज
महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली. याआधी या तिघींचीही अॅंटीजेन रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. मात्र आता ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्या यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. तर, जया बच्चन यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
बच्चन कुटुंबीय राहत असलेला जलसा हा बंगला सील करण्यात आला असून त्याला कन्टेंन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. जलसामध्ये सध्या पालिकेचे डॉक्टर असून घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चाचणी केली जाणार आहे. शनिवारी रात्रीच बीग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले.
बातमीदार - निवृत्ती हारकारे, कार्वे प्रतिनिधी
No comments:
Post a Comment