चंदगड तालुक्यात आज सात रुग्णांची भर, स्थानिक संसर्गामुळे विशेष सतर्कता बाळगण्याची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2020

चंदगड तालुक्यात आज सात रुग्णांची भर, स्थानिक संसर्गामुळे विशेष सतर्कता बाळगण्याची गरज


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात सामुहिक संसर्गाला सुरवात झाल्याने शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल 16 रुग्ण सापडले होते. त्यात आज भर पडून आज दिवसभरात सात रुग्णांची पडली आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यातील नागरीकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आज सायंकाळी साडेसहा वाजता आलेल्या अहवालानुसार चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी येथील चार, लक्कीकट्टे, कुदनूर व ढेकोळीवाडी येथे प्रत्येकी एक असे सात पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चंदगड तालुक्याची रुग्णसंख्या 145 वर पोहोचली आहे. काल शुक्रवारी तांबुळवाडी गावातील अकरा रुग्ण तर आज चार असे एकूण 15 पंधरा पाॅझिटीव्ह रुग्ण झाले आहेत.

       चंदगड तालुक्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग वाढत असल्याने चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे यांनी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींना सुचना दिल्या आहेत. मागील काही दिवसांमध्ये कारखान्यातील काही कर्मचारी पाॅझिटीव्ह आलेले आहेत व त्यांच्या संपर्कात आलेले नागरिक पाॅझिटीव्ह आढळत आहेत.त्यामुळे क्रुपया सर्व सर्व सरपंच पोलिस पाटील तलाठि ग्रामसेवक ग्रामदश्रता समिती यांनी आपल्या गावामध्ये असणारे कारखान्यातील कर्मचारी यांची यादी करुन त्यांना व त्यांचे कुटुंबीय यांना क्वारंटाईन करावे,  प्रथमतः कर्मचारी यांचे स्वाब घेणेसाठी संपर्क करावा, स्वाब अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन करावे, स्वाब घेतलेले नागरिक क्वारंटाईन न होता बाहेर फिरत असतीन तर गुन्हे दाखल करावेत, आजपर्यंत पाझिटीव्ह आलेल्या नागरिकांचे संपर्कातिल यादी करुन क्वारंटाईन करावे.


No comments:

Post a Comment