लाॅकडाऊन काळातील वीज बिले माफ करावीत - भाजप जिल्हा उपाध्यक्ष शांताराम पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2020

लाॅकडाऊन काळातील वीज बिले माफ करावीत - भाजप जिल्हा उपाध्यक्ष शांताराम पाटील

दौलत हलकर्णी
          सध्या जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यापासुन सर्वत्र लॉकडाऊण आहे. या काळात विद्युत वितरण कपंणीने जादा दरानुसार विज बिले ग्राहकांच्या माथी मारली आहेत. सद्यस्थितीत उद्योगधंदे, व्यवसाय पुर्णता बंद आहेत. त्यातच शेतकरी पिकवलेला माल बाजारात विकु शकला नाही. शेतातच कुजुन गेला. त्यामुळे सद्यस्थितीत शेतकरी व व्यवसाईक विद्युत बिले भरु शकणार नाहीत.
          त्यामुळे ही बिले पुर्ण माफ व्हावीत अन्यथा बिलांची होळी करण्याचा इशार भाजप जिल्हा उपाध्यक्ष शांताराम पाटील यांनी निवेदणाद्वारे हलकर्णी फाटयावरील विद्युत वितरण कपंणीचे अभिंयता श्री. कांबळे यांना दिले. यावेळी परिसरातील विद्युत ग्राहक व नागरीक उपस्थित होते

No comments:

Post a Comment