चंदगड ते चंदगड फाटा रस्त्यावर वृक्षतोडीमुळे घाणीचे साम्राज्य, नागरीकांचे आरोग्य धोक्यात - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2020

चंदगड ते चंदगड फाटा रस्त्यावर वृक्षतोडीमुळे घाणीचे साम्राज्य, नागरीकांचे आरोग्य धोक्यात

चंदगड ते चंदगड फाटा दरम्यान वृक्षतोडीमुळे पालापाचोळा कुजून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. 
सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
    चंदगड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे चंदगड ते चंदगड फाटा या मार्गावर रहात असलेल्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. याबाबत स्थानिक लोकांतून असंतोष व्यक्त केला जात आहे.
         या मार्गावर दुतर्फा असलेल्या मोठ-मोठ्या झाडांची रस्ता रुंदीकरणासाठी तोड केली जात आहे. बिटीश काळात लावलेली ही झाडे भल्या मोठ्या आकारात असून परिसरात विस्तारलेली आहे.  यामध्ये आंबा, फणस, वड, सिसम इत्यादी जातीची लाखो रुपये किमतीची हि झाडे कोल्हापूर जिल्ह्यात एक आकर्षण होती. मात्र या झाडांची तोड केल्याने पर्यावरण प्रेमींतून नाराजी व्यक्त केली जात आहे. 
       चंदगड ते चंदगड फाटा दरम्यानच्या रस्त्यावरील दुतर्फा झाडे तोडल्याने त्या झाडांच्या फांदा व पालापाचोला गटारीमध्ये पडल्या आहेत. त्यामुळे हा पालापाचोळा पावसामुळे कुजून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. फाद्यांच्या पाल्यामुळे चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी डासांचे प्रमाण वाढले असून या परिसरात वास्तव्य करणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 
         याच बरोबर काही ठिकाणी ज्या झाडांच्या फांद्या वाळलेल्या आहेत. ती झाडे प्रथम तोडणे जरूरीचे होते. कारण अशा झाडांच्या फांद्या 
रस्त्याकडे कलडल्याने झाडाला लटकल्या आहेत. यातील एखादी फांदी वाटसरू, दुचाकी, चारचाकीवर पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. होणाऱ्या घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील का असा सवाल व्यक्त होत आहे.
                 बातमीदार - चेतन शेरेगार, चंदगड-प्रतिनिधी


No comments:

Post a Comment