दाटे : सी एल वृत्तसेवा
मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांचा तिव्र निषेध करण्यात आला.
दाटे ता. चंदगड येथे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 12 रोजी बैठक पार पडली. पत्रकार, अधिकारी व पोलीस अधिकारी यांचे साटेलोटे असल्याची पोस्ट तालुक्यातील काही व्हाट्सअप ग्रुप वर काहींनी व्हायरल केली होती. या बिनबुडाच्या आरोपांची गंभीर दखल घेत अशा प्रवृत्तींविरोधात पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. तथापि बैठक चालू असतानाच संबंधितांनी फोन करून याबाबत लेखी माफी मागत असल्याचे केले. त्याच्या माफीनाम्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
बैठकीत पत्रकार संघामार्फत तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका व सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोरोना योद्धा म्हणून बजावलेल्या कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देणे, बोगस पत्रकारांना आळा घालणे, तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या शासकीय पातळीवरील उपाययोजना व विविध सामाजिक प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, संस्थापक अध्यक्ष अनिल धुपदाळे, संस्थापक उदयकुमार देशपांडे, पत्रकार संघ संचलितं न्यूज चॅनेल चे संपादक संपत पाटील, सदस्य एस के पाटील, चेतन शेरेगार, संतोष सुतार, निवृत्ती हारकारे, राजेंद्र शिवणगेकर, प्रकाश ऐनापुरे, संदीप तारीहाळकर, संजय एम. पाटील, महेश बसापुरे, तातोबा पाटील, नंदकिशोर गावडे आदी पत्रकारांची उपस्थिती होती. आभार पत्रकार संघ सचिव चेतन शेरेगार यांनी मानले.
No comments:
Post a Comment