चंदगड तालूका ग्रामपंचायत कर्मचारी आंदोलनाचे निवेदन देताना. |
तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने सहाय्यक गटविकास अधिकारी श्री आळंदी व टी पी ओ श्री ठोंबरे यांना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार महासंघ चंदगड च्या वतीने आज निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये किमान वेतन मिळवण्यासाठी अडथळा आणणारा वसूलीची व उत्पन्नाची अट घालणारा शासनाचा २८ एप्रिल २०२०चा आदेश रद्द करावा , शासनमान्य किमान वेतन व रहाणीमान भत्ता मिळालाच पाहिजे , लोकसंख्येचा कालबाह्य आकृतीबंध रद्द् करावा , कपात केलेली भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर त्वरीत जमा करावी , वेतन निश्चिती समितीच्या शिफारसी मान्य कराव्यात , निवृत्ती वेतन योजना सात्काळ लागू करावी आदि मागण्यांचे निवेदन देण्यात आले . यावेळी धरणे आंदोलनाचे निवेदन नामदेव गावडे, परशराम जाधव ,एकनाथ राघोजी व शिवाजी कांबळे यानी प्रशासनास दिले.
No comments:
Post a Comment