दारात अळंबीच्या रूपात चक्क नागदेवतेचे दर्शन, आमरोळी येथे महिलांनी केली पूजा - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2020

दारात अळंबीच्या रूपात चक्क नागदेवतेचे दर्शन, आमरोळी येथे महिलांनी केली पूजा

आमरोळी ता.चंदगड येथे शारूबाई देसाई यांच्या घरी उमललेले नागरूपातील अळंबे.
चंदगड / प्रतिनिधी
         देवदर्शन कोणत्या वस्तू किंवा पदार्थात होईल, याचा नेम नसतो. गणेशदर्शनही वेगवेगळ्या रूपात घडत असल्याचे नेहमी पहावयास मिळते. मात्र नाग पंचमीच्या पूर्वसंध्येला दारात उगवलेल्या अळंबीच्या रूपात चक्क नागदेवतेचे दर्शन घडल्याने या प्रकारची पंचक्रोशीत चर्चा होत आहे. आमरोळी ( ता.चंदगड) येथील.शारूबाई गणपत देसाई यांच्या घरासमोरील समोरच्या खोलीत हा प्रकार घडला आहे.
        शनिवारी सर्वत्र पारंपारिक उत्साहात नागपंचमी साजरी करण्यात आली. घरोघरी मातीच्या नागमूर्तीचे पूजन करून आराधना करण्यात आली. मात्र आमरोळी येथे वनस्पतीच्या रूपात नागदर्शन घडले. शनिवारी सकाळी दारात उंबरठ्या शेजारी एक  अळंबी  विस्तीर्ण रूपात उगवल्याचे शारूबाई च्या निदर्शनास आले. त्यांनी बारकाईने पाहिले असता हा आकार सर्पाप्रमाणे असल्याचे जाणवले. या प्रकारची काही वेळेतच गावभर चर्चा झाली. नागपंचमी दिवशी योगायोगाने अळंबीला सर्पाचा आकार आल्याने नागरिकांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. काही महिलांनी हळदीकुंकू वाहून मनोभावे प्रार्थना केली.

No comments:

Post a Comment