चंदगड शहराला कोरोनाची धास्ती, आतापर्यंत 27 जण पाॅझिटीव्ह - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2020

चंदगड शहराला कोरोनाची धास्ती, आतापर्यंत 27 जण पाॅझिटीव्ह

चंदगड / अनिल धुपदाळे
       कोरोनाच्या संशयामुळे शुक्रवारी चंदगड शहरातील  सत्तावीस जनांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी एकोणीस जनांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. त्यामुळे चंदगड शहरात खळबळ उडाली आहे. 
शहरातील  बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी राहणा-या कुटुंबातील तीन व  एकाच घराण्यातील पाच कुटुंबातील असे एकूण एकोणीस जनांचा अहवाल पाॅझिटीव्हआला आहे.  
              शुक्रवारी  शहरातील पंचवीस व कोल्हापूर येथे दोन असे शहरातील एकूण सत्तावीस जनांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. गेल्या आठवड्यात शहरातील ग्रामीण रूग्णांलयासाठी आमदार फंडातून रूग्णवाहीका प्रदान करण्यात आली होती. यासाठी कार्यक्रमावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व खासदार संजय मंडलिक, आम.राजेश पाटील, जि.प.उपाध्यक्ष सतिश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे,संघटक संग्रामसिंह कुपेकर हे उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत तसेच तालुक्यातील कार्यकर्ते  नगर पंचायतचे काही  पदाधिकारी, यांच्या उपस्थितीत रूग्णांलय आवारात रूग्ण वाहीका प्रदान कार्यक्रम  संपन्न झाला होता. यावेळी पावसाने हजेरी लावल्याने सर्व नेते मंडळी व बरेचसे कार्यकर्ते ग्रामीण रुग्णालयात गेले होते. यावेळी  उपलब्ध जागा व जमलेल्यांची गर्दी पाहता व त्यानंतर तहसीलदार कार्यालयात आयोजित केलेल्या आरोग्य विभागाची आढावा बैठक व यावेळी उपस्थितांचे स्वागत  या कार्यक्रमानंतर कांहींच दिवसांत खा..मंडलिक यांना झालेल्या कोरोना लागण च्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला उपस्थित राहीलेल्यांत संशयास्पद वातावरण होते. दरम्यान. खा.मंडलिक यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी  असे आहवाल केले होते.
                     शहरातील शुक्रवारी तब्बल सत्तावीस जनांची तपासणी करण्यात आली होती. पैकी एका गुरुवार पेठेतील मध्यवर्ती कुटुंबातील  तीघांचा अहवाल पाॅझिटीव्ह  निघाला आहे .शहरात पंचवीस पैकी  सोळा मिळून एकूण सव्वीस जनांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. शहरातील हे वातावरण पाहता आजरा नगरपंचायत कडून ज्याप्रमाणे विविध स्तरातील लोकांची  कोरोना तपासणी करण्यात आली. त्या पध्दतीने चंदगड शहरातही तपासणी करण्यात आली तर  संशयास्पद वातावरण कमी होण्यासाठी मदत होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन केले तरच या फैलावाला रोखता येईल. यासाठी सर्वांनी स्वत:ची  तसेच एकमेकांची काळजी घेणं आवश्यक आहे. शहरातील नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक  आहे. कारण जीवन हे बहुमोल आहे. त्यासाठी आपण स्वत:च काळजीपूर्वक राहणे अत्यंत आवश्यक आहे. चंदगड शहरात पुन्हा काही दिवस कडक लाॅकडाऊन करण्यासाठी नियोजन केले तर प्रादुर्भाव कमी होण्यासाठी मदत होईल.

No comments:

Post a Comment