![]() |
वाढदिवसाच्या खर्चात कपात करुन गरुजुंना खाऊ वाटप करताना सावंत कुटुंबिय. |
आपल्या मुलाचा वाढदिवस तो पण पहिला वाढदिवस म्हटल्यावर आई- वडिलांना फार आनंद होतो. प्रत्येकाला आपल्या मुलांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करावा असे वाटते, त्यासाठी बराच खर्च करायला ते तयार असतात. परंतु सभोवतली अशी अनेक मुले असतात ज्यांना एक वेळचे जेवण पण मिळत नसते. जर वाढदिवसाचा खर्च थोडा कमी करून अशा मुलांना खाऊवाटप वाटप केले तर आपल्या मुलांचे आशीर्वाद मिळतील. असा विचार करुण माणगाव (ता. चंदगड ) येथील उदय व गौतमी सावंत या उभयतांनी आपली मुलगी दुर्वा हिचा पहिला वाढदिवस अत्यंत साध्या प्रकारे साजरा करून काही खर्च भटक्या विमुक्त गरजू मुलांना खाऊवाटप करुण साजरा केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष पिनू उर्फ प्रताप पाटील, स्वरसाधना मंडळाचे अध्यक्ष संजयदादा रामगावडे, माणकेश्वर गणेश मंडळ चे सर्व सदस्य अदि मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment