सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १३ (बिनविषारी साप) तस्कर - चंदगड लाईव्ह न्युज

12 August 2020

सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १३ (बिनविषारी साप) तस्कर

सी. एल. न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेलच्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १३ 
सापाचे नाव - (बिनविषारी साप)*तस्कर* Common Trinket Snake (Elaphe helena)

तस्कर साप जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारत सोडून संपूर्ण देशात सर्वत्र आढळतो. (शास्त्रीय नावःElaphe helena) हा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट अथवा साधा म्हणतात. अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा आहे. तस्कर चा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा. याची लांबी साधारणपणे  १ मीटर पर्यंत व जाडी ३ सेमी पर्यंत असते. रंगाने तपकिरी, बदामी, पिवळसर असतो. अंगावर पट्टे असतात हे पट्टे  बुद्धीबळातील पटासारख्या छोट्या काळ्या पांढर्‍या चौकोनांनी भरलेले असतात. मानेवर इंग्रजी व्ही (v) किंवा दोन काळ्या समांतर रेघांची उठून दिसणारी मुद्रा असते. या सापाची मादी अंडी घालते.

तस्कर साप मुख्यत्वे दक्षिण भारत, श्रीलंका मध्ये आढळतो. महाराष्ट्रात सर्वत्र पण सह्याद्री रांगांलगत पश्चिम महाराष्ट्रात अधिक संख्येने आढळतो. विशेषतः छोटी जंगले, मानवी वस्त्यातील गव्हाणी, आडगळीच्या जागा अशा ठिकाणी राहतो. छोटे उंदीर, पाली, सरडे, पक्ष्यांची अंडी, बेडुक इत्यादी हे तस्कर सापाचे खाद्य आहे.

माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  मा. तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  


सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

*शब्दांकन / संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.  संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment