शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची संजय गांधी विद्यालयाला सदिच्छा भेट - चंदगड लाईव्ह न्युज

12 August 2020

शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची संजय गांधी विद्यालयाला सदिच्छा भेट

नागनवाडी (ता. चंदगड) येथे संजय गांधी विद्यालयात मुख्याध्यापक एम. आर. भोगूलकर यांचा सत्कार करताना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर व इतर.
चंदगड / प्रतिनिधी
   शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी  कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर  यांनी आज नागनवाडी येथील संजय गांधी विद्यालयास सदिच्छा भेट दिली. दहावी परीक्षा मार्च 2020, एनएमएमएस राष्ट्रीय शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय निवड परीक्षेत विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मुख्याध्यापक एम. आर. भोगुलकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे ही त्यांनी कौतुक केले.

                                                                       जाहिरात
जाहिरात
       शाळेच्या शैक्षणिक उन्नतीसाठी अद्ययावत इमारत व अन्य सुविधा गरजेच्या आहेत असा सर्वसामान्य समज असताना अतिशय तुटपुंज्या भौतिक सुविधा असतानाही केवळ खडतर परिश्रम व समर्पणाच्या जोरावर उज्ज्वल यश संपादन करता येते. हे संजय गांधी  विद्यालयाच्या कामगिरीवरून दिसून आल्याचे डॉक्टर नांदवडेकर यांनी स्पष्ट केले. शिक्षणाच्या बाजारीकरणाला ज्ञानदानाचे पवित्र कार्य ठरवत असताना कर्तव्यभावनेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे डॉ. कुलकर्णी यांनी प्रशंसा केली. यावेळी के. डी. बारवेलकर, व्ही. बी. पाटील, जी. एम.  धुमाळे, एस. एस. गुरव, सौ. विजयमाला हूलजी, सौ. एस. एस. पाटील, ए. डी. पाटील, श्रीमती सारीका टक्केकर उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment