म्हाळेवाडी येथे माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण - चंदगड लाईव्ह न्युज

12 August 2020

म्हाळेवाडी येथे माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण

म्हाळेवाडी (ता.चंदगड) येथे माजी आमदार कै.नरसिंगराव पाटील यांच्या अर्धकृती पूतळयाच्या अनावरण प्रसंगी आमदार राजेश पाटील व सौ सुश्मिता पाटील 
चंदगड / प्रतिनिधी 
   चंदगड तालूक्याच्या हरित क्रांतीचे प्रणेते,माजी आमदार  दौलत साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नरसिंगराव गूरूनाथ पाटील यांच्या चौथ्या  पुण्यतिथी निमित्त म्हाळेवाडी (ता. चंदगड) या मूळ गावी त्यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण 
 करण्यात आले .गुरुवर्य गुरुनाथ पाटील दुग्ध संस्थेच्या इमारतीमध्ये अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण तालूका संघाचे माजी अध्यक्ष  भिकू तुकाराम गावडे यांच्या हस्ते करण्यात आले . या वेळी भिकू गावडे यानी तालुक्याच्या विकासात नरसिंगराव पाटील यांचे मोठे योगदान आहे . त्यांनी दौलत कारखान्याच्या माध्यमातून आशिया खंडातील पहिला बायोस्टील डिस्टीलरी प्रकल्प सुरु केला.जंगहमहट्टी , झांबरे ,फाटकवाडी , काजिर्णे यासारखे मध्यम प्रकल्प त्यांच्या कालावधीत पूर्ण झाले. तालुका खरेदी विक्री संघाची स्थापना केली . जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन , नॅशनल हेवी इंजिनीरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अशी अनेक पदे सांभाळली . रासायनिक खत कारखाना , शिनोळी व हलकर्णी येथे औधोगिक वसाहत स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता असे सांगून कै.नरसिंगराव पाटील यांच्या कार्यांचा आढावा घेतला .या वेळी आमदार राजेश पाटील ,सौ सुस्मिता राजेश पाटील, तानाजी गडकरी, अभय देसाई, विष्णू पाटील,कृष्णराव वाईंगडे, दादू केसरकर, रामचंद्र दळवी,राणू गावडे,एस वार पाटील,  विष्णू आढाव, दत्ता पाटील, उत्तम चांदेकर,धोंडिबा गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment