वादळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन भरपाई देण्याची बळीराजा संघटनेचे तहसिलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

12 August 2020

वादळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन भरपाई देण्याची बळीराजा संघटनेचे तहसिलदारांना निवेदन

त्वरीत मदत जाहीर न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
बळीराजा संघटनेच्या वतीने पिकांना नुकसानभरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार विनोद रणवरे यांना देताना नितीन पाटील व सहकारी. 
चंदगड / प्रतिनिधी
    मागील आठवड्यात झालेल्या जोरदार वादळी पावसाने चंदगड तालुक्यातील ऊस,भात व केळी शेती जमिनदोस्त झाली. या वादळात ऊस,भात,व केळी आदी फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच खरीप पिकांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. कष्टाने पिकवून हातातोंडाशी आलेले पिक गेल्याने बळीराजा हताष झाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी तुफानी पावासाने चंदगड तालुक्याला तडाखा दिला आहे. एकीकडे कोरोनाचे संकट असतांना पावसाने शेतकऱ्यांची नगदी पिके हातची गेली आहेत. चंदगड तालुक्यातील साधारण बारा हजार हेक्टर ऊस शेती संकटात आली आहे. तर दुसरी नगदी पिके असलेल्या काजू, केळीच्या बागा देखिल भुईसपाट झाल्या आहेत. अशा संकटाच्या काळात शासनाने त्वरीत पंचनामे करुन नुकसानीची भरपारई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे.
                                             जाहिरात
जाहिरात
         मागील वर्षीच्या महापूराने ताम्रपर्णी आणि घटप्रभा नद्यांच्या खोऱ्यातील भातशेती संपूर्ण उध्वस्त झाली होती. त्याचबरोबर उसाचेही पन्नास टक्क्याहून अधिक नुकसान झाले होते. त्यातून सावरत यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी चांगला ऊस घेतला होता. मात्र, गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नदिकाठच्या उसासकट माळावरचा उसही भूईसपाट झाला. त्याचा परीणाम येणाऱ्या साखर गळीत हंगामावर होणार आहे. त्यामुळे या विभागातील साखर कारखान्यांसह उस तोडणी यंत्रणेचा प्रश्न निर्माण होणार आहे. गळीत हंगामाला अजून उशीर असल्याने या उसाची मोठी हानी होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी उद्धस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाने त्वरीच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन मदत निधी जाहीर करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा तालुक्यातील बळीराजा रस्त्यावर उतरुन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.
      त्यामुळे तात्काळ नुकसानीचा पंचनामा करुन मदत करण्याची मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबतचे निवदेन तहसिलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले. निवेदनावर बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, कृष्णा पाटील, मारुती पाटील,  देवदास पाटील, सिताराम बोंगाळे, संजय मोरे, शंकर पडते, रामराव झाजरी, तुषार शिंदे, संजय गावडे,  निवृत्ती मसुरकर आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

No comments:

Post a Comment