गडहिंग्लज तालुका काँग्रेस कमिटी कडून गुरबे यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

07 August 2020

गडहिंग्लज तालुका काँग्रेस कमिटी कडून गुरबे यांचा सत्कार

गडहिंग्लज तालुका काँग्रेस कमिटी कडून गुरबे यांचा सत्कार झाला. यावेळी उपस्थित पदाधिकारी. 
चंदगड / प्रतिनिधी
          गडहिंग्लज येथे काँग्रेस कमिटी च्या वतीने यशवंत बझार येथे कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस पदी व आजरा गडहिंगलज चंदगड तालुका समन्वयक पदी नियुक्ती झाले बद्दल गडहिंग्लज  काँग्रेस कमिटी च्या वतीने सत्कार गडहिंग्लज तालुका  काँग्रेस अध्यक्ष बी .एन .पाटील गिजवणेकर याच्या हस्ते  करण्यात आला. तिन्ही तालुक्यात काँग्रेस ऊर्जाअवस्थेत  आणण्याकरिता   जिल्ह्याचे पालकमंत्री व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष  तथा पालकमंत्री ना.सतेज ऊर्फ बंटी डी पाटील यांनी  विद्याधर गुरबे सारख्या काँग्रेस  निष्ठावंत तरुण  कार्यकर्ते ची निवड केली ते नक्कीच तिन्हीही तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढवतील असा विश्र्वास बी .एन .पाटील गिजवणेकर यानी सत्कार निमीत्ताने सांगीतले. गुरबे यांनी सांगितले की जेष्ठ  नेत्याच्या मार्गदर्शन खालीच माझी वाटचाल चालु आहे आमचे दैवत जिल्ह्याचे  नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी  माझ्यावर अंत्यत विश्वासाने माझ्यावर जिल्हा सरचिटणीस व तिन्ही तालुक्याचे समवयस्क पदी निवड केली त्याचा मी उपयोग काँग्रेस वाढी साठी तसेच काँग्रेसचे विचारसरणी जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करीन.व माझ्या नेत्यांचा विश्वास सार्थ ठरवीन. या कार्यक्रमास शहर.अध्यक्ष बसवराज आजरी तसेच अॅड.दिग्वीजय कुराडे , प्रशांत देसाई ,अँड बाळासाहेब पाटील. मारुती कांबळे .राजेसाहेबांनी पाटील.यत्त्री अण्णा केसरकर. विरसिंग बिल्लावर .सचीन मुळे .संतोष चौगुले  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment