अस्वलाच्या हल्यात जखमी झालेले उत्तम गावडे यांना नुकसान भरपाईपोटी सव्वालाखाचा धनादेश देताना वनविभागाचे अधिकारी. |
चंदगड / प्रतिनिधी
पिळणी (ता. चंदगड) येथे अस्वलाच्या हल्ल्यात उत्तम गावडे हा तरुण जखमी झाला होता. या प्रकरणी नुकसान भरपाईपोटी वनविभागाकडून त्यांना 1 लाख 25 हजारांचा धनादेश देण्यात आला.
घटना अशी की, रात्री दहाच्या दरम्यान उत्तम तुकाराम गावडे (वय-38) आणि त्यांचे बंधू सुरेश तुकाराम गावडे हे दोघे शेतातून आपल्या घराकडे परत येत होते. यावेळी पिळणी गावाच्या मागील बाजूस शेताकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर अचानकपणे अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात उत्तम गावडे हे जखमी झाले होते. हल्ल्यात गावडे यांच्या पायाला दुखापत झाली होती..गावडे यांना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र चंदगड येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णांलयात हलविले होते. वन विभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून शासनाकडे अहवाल पाठवला होता. वन विभागाकडून जखमी व्यक्तीस तात्काळ स्वरूपाच्या औषध उपचारासाठी पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली होती.
उत्तम गावडे यांच्या प्रकरणाची दखल घेऊन शासनाने नुकसानभरपाई स्वरूपात एक लाख पंचवीस हजार (१,२५,०००) रुपयांचा धनादेश मंजूर केला. संदेश पाटील सहाय्यक वनसंरक्षक (खा. कु.तो व वन्यजीव) यांनी उत्तम गावडे यांचया प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्याकडे १,२५,००० रूपये नुकसानभरपाईचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी चंदगडचे वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे, वनपाल ए. डी. वाजे, डी. जी. पाटील, वनरक्षक एस. एस. पोवार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment