पोलीस कॉन्स्टेबल सचिन वायदंडे यांची माणुसकी - चंदगड लाईव्ह न्युज

07 August 2020

पोलीस कॉन्स्टेबल सचिन वायदंडे यांची माणुसकी


खाकी वर्दीतील माणूसकी जपणारे पो .कॉ. सचिन वायदंडे.
आजरा /सी .एल. वृत्तसेवा
            आजरा पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल सचिन वायदंडे यांची आज पोलिसातील माणुसकी गवसे तपासणी नाक्यावर दिसून आली .त्यांच्यातील या माणुसकीने आम्हालाही गहिवरून आले. त्याचे कारण असे कि, आज दुपारी दोन च्या सुमारास गवसे येथील तपासणी नाक्यावर इतर कर्मचाऱ्या सहित वायदंडे हजर होते. यावेळी तेथे 40 वर्षीय वयाचा व्यक्ती आपल्या 7 महिन्याच्या बाळाला घेऊन भरवत बसला होता. हा माणूस त्या बाळाला घेऊन गोव्याहून चालत आला होता .हणमंत बाबुराव डोंबाळे असे त्या व्यक्तीचे   नाव . जोराचा वारा,मुसळधार पाऊस हे सर्व झेलत उपाशी पोटी हणमंत चालत आला होता. बाळ पण भुकेलेले होते. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सचिन यांनी नुकताच आपला जेवणाचा डबा सोडला. त्यांनी हन्मंतला पाहिले व त्यांना असे वाटले की त्याची पत्नी हन्मंतला व मुलाला सोडून पळून किंवा निघून गेली असणार. हणमंत चालत सोलापूरला निघाला होता. पो. कॉ. सचिन वायदंडे  यांनी तात्काळ आपला जेवणाचा डबा व पाण्याची बाटली त्यांना दिली. हन्मंताने आपल्या बाळाला पोटभर भरवले. यावेळी हन्मंताच्याही चेहऱ्या वर समाधान पहायला मिळाले नंतर त्याला इचलकरंजी ला जाणाऱ्या गाडीत बसवून पाठवून दिले. सोबत आर्थिक मदत हि दिली. खाकी वर्दीतील अशी माणुसकी जपणारे असे अनेक पो. कॉ. सचिन वायदंडे तयार  व्हांवेत हिच अपेक्षा. पो. कॉ .सचिन वायदंडे यांच्या माणुसकीला आमचा सलाम.

1 comment:

Unknown said...

खूप छान, वायदंडे तुम्हाला आमचा सलाम..

Post a Comment