तुर्केवाडीमध्ये अभिषेक घालून आनंदोत्सव साजरा, राम मंदिर निर्माणासाठी ग्रामस्थांकडून १ लाख ११ हजार रुपये निधी - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2020

तुर्केवाडीमध्ये अभिषेक घालून आनंदोत्सव साजरा, राम मंदिर निर्माणासाठी ग्रामस्थांकडून १ लाख ११ हजार रुपये निधी

प्रसादाचे वाटप
तुर्केवाडी (प्रतिनिधी) : 
           अयोध्येत श्री राम जन्मभूमीवर एतिहासिक राम मंदिराच्या भूमीपूजन आणि पायाभरणी समारंभ होत आहे. या मंगलमय क्षणाचे औचित्य साधून तुर्केवाडी येथे राम मंदिर निर्माणासाठी अभिषेक घालून प्राथना करण्यात ली. तसेच धार्मिक कार्यक्रम घेवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
         श्री राम मंदिर पायाभरणीनिमित्त बुधवारी पहाटे तुर्केवाडी येथील ब्रम्हलिंग मंदिरात श्रीराम व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मंत्रोच्चार, रामरक्षा तसेच भजन करुन हा मंगलमय सोहळा साजरा करण्यात आला. गावातील ब्रम्हलिंग, रवळनाथ, मारुती तसेच महालक्ष्मी मंदिरात महाप्रसाद नैवद्य दाखवून मंदिर निर्माणासाठी प्राथना करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये सरपंच रुद्राप्पा तेली यांनी श्रीरामाची आरती केली. त्यानंतर श्रीराम सेनेचे ज्ञानेश्वर राशिवडेकर यांनी रामरक्षा, ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्रांचा उच्चार केले. तर सोपानदेव भजनी मंडळातील सदस्यांनी भजनाच्या माध्यमातून रामाचे स्मरण केले. यावेळी ज्येष्ठ विणावादक श्री. बाळू गावडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विणावादक श्री. बाळू गावडे यांचा सत्कार करण्यात आला. अयोध्येतील राम मंदिरासाठी तुर्केवाडी ग्रामस्थांच्या वतीने १ लाख ११ हजार रुपये निधी देण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ सदस्य गोपाळ ओऊळकर यांनी सांगिलते. तर गावातील सदस्य मोहन निवगिरे, शंकर ओऊळकर यांनी प्रत्येकी पाच हजारांचा निधी देणार असल्याचे यावेळी घोषित केले. तसेच गावातील इतर नागरिकांनी यथाशक्ती देणगी देण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.

                                महाप्रसादाचे वाटप 
यावेळी सरपंच रुद्राप्पा तेली, ज्येष्ठ सदस्य गोपाळ ओऊळकर, शंकर ओऊळकर, मोहन निवगिरे, भरमाणा गावडे, लक्ष्मण गावडे, विश्वनाथ ढेकोळकर, सुरेश गावडे, भरमाण्णा अडकूरकर, ज्ञानेश्वर राशिवडेकर, अशोक ओऊळकर तसेच श्रीराम सेनेचे सदस्य, सोपानदेव भजणी मंडळी, समस्त गामस्त मंडळ उपस्थित होते.

                       राम जन्मभूमीला गावातून गेली होती विट
यावेळी लक्ष्मण गावडे यांनी गावातील तरुणांनी अयोध्येला जावून मंदिर निर्माणासाठी विटा देऊन आल्याची आठवण सांगितली. मंदिर निर्माणाच्या आंदोलनावेळी तुर्केवाडी गावातील अमृत मोरे, लक्ष्मण गावडे, विठ्ठल सुतार, सचिन पाटील, नंदकुमार गावडे, विलास ओऊळकर या तरुणांनी गावातून पाच विटा मंदिर निर्मासाठी अयोध्येला नेवून दिल्या होत्या. तसेच आठवण म्हणून अयोध्येतून त्रिशूल आणून मंदिरात ठेवणल्याची आठवण सांगितली.


No comments:

Post a Comment