अन् प्रशासनाची उडाली तारांबळ, जिल्हाधिकारी यांची चंदगडला भेट, मिरवेलला दरड कोसळलीच नाही - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2020

अन् प्रशासनाची उडाली तारांबळ, जिल्हाधिकारी यांची चंदगडला भेट, मिरवेलला दरड कोसळलीच नाही

दरड कोसळल्याचे संग्रहित छायाचित्र
नंदकुमार ढेरे / सी. एल. न्युज प्रतिनिधी
              मिरवेल (ता. चंदगड) येथे घरावर दरड कोसळून पाच नागरिक गाडले गेलेत,असा फोन कूणीतरी जिल्हाधिकारी येथील  आपत्ती व्यवस्थापन केंद्राला केल्याने एकच तारांबळ उडाली. आपत्ती व्यवस्थापनच्या कार्यकर्त्यासह जिल्हाधिकारी दौलत देसाई यानी चंदगड गाठले, मात्र या ठिकाणी चौकशी केली असता  काहीच घडले नाही,दरड कोसळल्याची हि केवळ अफवाच ठरली.
             गेले तीन दिवस चंदगड ला मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. आज मंगळवार दि ४रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राला कूणीतरी फोन केला.कि चंदगड तालुक्यातील मिरवेल येथे घरावर दरड कोसळून पाच नागरिक गाडले गेले आहेत, लागलीच जिल्हाधिकारी दौलत देसाई यानी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणे सह चंदगड मिरवेल ला जाण्यासाठी सज्ज झाले, जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना सूचना केल्या,प्रांताधिकारी पांगारकर या उत्साळी ता चंदगड येथेच शासकीय कामासाठी आल्या होत्या, त्यांनी तहसिलदार विनोद रणवरे यांना याबाबत माहिती देऊन मिरवेल ला जाण्यासाठी सुचवले. दरम्यान मिरवेल चे माजी सरपंच विद्याधर बाणे, पोलिस पाटील, तंटामूक्त अध्यक्ष याना संपर्क साधण्याचा प्रयत्न सूरू केले पण रेंज नसल्याने कुणालाही संपर्क झाला नाही. तोपर्यंत प्रांताधिकारी, तहसिलदार व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणे तील कार्यकर्ते प्रत्यक्ष मिरवेल गावात दाखल झाले.पण मिरवेल येथे काहीच घडले नव्हते. आल्या पावली सर्वजण माघारी आले.दरम्यान तो पर्यंत जिल्हाधिकारी दौलत देसाई हे सुध्दा हेरे येथे पोहोचले होते.रेंज मध्ये आल्यानंतर प्रांताधिकारी विजया पांगारकर यानी जिल्हाधिकारी देसाई यांना  सविस्तर माहिती दिली.मिरवेल येथे दरड कोसळली नाही, तर ती केवळ अफवा असल्याचे सिध्द झाल्याने आपत्ती व्यवस्थापन यत्रंणोला रिकामी हाती परतावे  लागले. कोल्हापूर ते चंदगड पारगड हे दिडशे  कि. मी. चे अंतर कापून आलेल्या यंत्रणेची मात्र दमछाक झाली. 


No comments:

Post a Comment