संदीप तारीहाळकर / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड-आजरा-गडहिंग्लजच्या नवोदित कलाकारांना सामावून घेऊन मुळच्या केंचेवाडी व सध्या नागनवाडी (ता. चंदगड) येथील माय-लेकिनी चिंतन हा तरुणांसाठी प्रबोधनपर चित्रपट साकारला आहे. दिग्दर्शक स्नेहल विलास पाटील (नागनवाडी), निर्माता म्हणून डॉ. प्रज्ञा विलास पाटील (नागनवाडी) व प्रकाश गोयंका (मुंबई) यांनी मोठे परिश्रम घेतले, तर यात मुख्य भूमिका आहे विनया विष्णू गावडे (दौलत हलकर्णी वसाहत) हिची. या शिवाय अन्य सुमारे 20 जणांच्या लहान-मोठ्या भूमिका आहेत. यात चंदगडचे निसर्ग सौंदर्यही रुपेरी पडद्यावर झळकले आहे.
विविध कारणाने शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन तरुण-तरुणी विविध कारणानी नैराश्येतुन आत्महत्येकड़े झुकत आहेत. असे प्रकार वाढत असल्याने त्यांचे प्रबोधन व्हावे, हा हेतू ठेवून हा चित्रपट बनवला असल्याचे त्यांनी सांगितले. नागनवाडीचे डॉ. विलास पाटील यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा पाटील व प्रकाश गोयंका (मुंबई) हे दोघे निर्माते आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. प्रज्ञा पाटील यांची मुलगी स्नेहल पाटील यांनी केले आहे.
या चित्रपटात दौलत हलकर्णी वसाहत येथील विनया विष्णू गावडे हिने मीरा ही मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय अब्दुल येरगट्टी (चंदगड), सोनीकुमारी पांडी (मजरे कारवे), माधवी राठोड (चंदगड), अमेय चराठी (आजऱा) प्रथमेश काकडे (गडहिंग्लज), श्रावणी शिरोडकर ( गडहिंग्लज), सानिका सावंत (पाटणे फाटा), सुप्रिया अडकूरकर (माडवळे), मीनल पाटील (हलकर्णी) यांच्यासह अन्य वीस कलाकारांचा यामध्ये सहभाग आहे. कोल्हापूर येथील डायटच्या प्राध्यापिका निशा काजवे यांनी यात आईची भूमिका पार पाडलीे आहे. गान्याचे लेखन व चित्रपट दिग्दर्शन स्नेहल पाटील यांनी केले. स्नेहल पाटील सध्या मुंबई येथे बिग बॉस या मालिकेकडे स्टोरी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. या सर्व चित्रपटाचे शूटिंग चंदगड तालुक्यातील नागणवाडी, फाटकवाडी धरण यासह गडहिंग्लज येथे झालेले आहे. गडहिंग्लज येथील साई इंटरनॅशनल स्कूल तसेच सर्वोदय स्कूल या ठिकाणी ही चीत्रिकरण झाले आहे. या चित्रपटाला संगीतकार म्हणून वैभव प्रतीक तर कॅमेरामन म्हणून अमित कुमार आहेत.
1 comment:
Are trailer/ social media kahitr link takat jaa.
Post a Comment