नेसरीत शेकापचा ७३ वा वर्धापनदिन उत्साहात, नागरिकांना मास्क वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2020

नेसरीत शेकापचा ७३ वा वर्धापनदिन उत्साहात, नागरिकांना मास्क वाटप

नेसरी: शेकापच्या ७३ व्या वर्धापनदिना निमित्त्य ध्वजारोहन प्रसंगी युवराज पाटील, वसंत कांबळे, लक्ष्मण नाईक, जयवंत दळवी, विजय कांबळे आदी.
नेसरी - सी .एल. वृत्तसेवा येथे शेतकरी कामगार
पक्षाचा ७३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झा ला. तारेवाडीचे उपसरपंच युवराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन  शेकापचे गडहिंग्लज तालुका चिटणीस वसंत कांबळे यांच्या हस्ते झाले. वसंत कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी कोरोना पार्श्वभूमीवर पक्षाच्यावतीने नेसरी ग्रामपंचायत, पोलीस ठाणे, ग्रामीण रूग्णालय, दुध संस्था, पेट्रोल पंप, महाविद्यालय, पेपर वितरक, नागरिकांना मास्कचे वाटप झाले. यावेळी विजय कांबळे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. संघटक जयवंत दळवी यांनी सुत्रसंचालन केले. सहचिटणीस लक्ष्मण नाईक यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment