तुषार सुतार |
मजरे कार्वे /प्रतिनिधी - सी एल न्यूज
मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत कार्वे येथील महात्मा फुले विद्यालय व गुरुवर्य म.भ.तुपारे ज्युनियर कॉलेज चा विद्यार्थी तुषार शंकर सुतार याने ८४.७६% गुण मिळवून कार्वे केंद्रात प्रथम, तर चंदगड तालुक्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. कोल्हापूर उच्च माध्यमिक बोर्डाने त्याच्या कार्याची दखल घेऊन दरवर्षी देण्यात येणार्या 'इंस्पायर अवार्ड' साठी टॉप १% मध्ये तुषार सुतारची निवड केली आहे. या अवॉर्ड अंतर्गत त्याला सलग पाच वर्षे प्रतिवर्षी ८० हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
कार्वे येथे कॉलेज मार्फत त्याचा यावेळी सत्कार करण्यात आला, यावेळी तुषार याने सदर अवॉर्डचा सदुपयोग करून संशोधक बनण्याची इच्छा व्यक्त केली. या यशामध्ये गुरु.म भ तुपारे ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक, पालक यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्याला शालेय समितीचे चेअरमन एम एम तुपारे, प्र. प्राचार्य एस वाय कुंभार, पर्यवेक्षक एल जी पाटील त्यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment